September 24, 2026

Blog

Spread the love


– वरिष्ठ काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
विरोधी पक्ष’नेते राहुलजी गांधी यांचे आरोपांना सह- निवडणूक आयुक्तांकडून पृष्टी …!!
पुणे दि २३ – ‘त्रिसदस्य निवडणुक आयोगातील’ दोन निवडणुक आयुक्तांनी, मुख्य आयुक्तांच्या निर्णयाबाबत वारंवार लेखी आक्षेप नोंदवल्याचे स्पष्ट झाले असून, राम मंदीर ट्रस्ट’ ऊभारणीची सुरवात करणारे तत्कालीन केंद्रीय अतिरिक्त गृह-सचिव ज्ञानेशकुमार यांना बक्षीसी म्हणूनच काय (?) मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्यात आल्यानेच ज्ञानेश कुमार एकतर्फी संविधानिक मुल्यां विरोधी भुमिका घेत व एसआयआर च्या माध्यमातून मनमानी करत, सत्तापक्षाची हुजरेगिरी करत, सत्ताधारी भाजप धार्जिणी भुमिका घेत असल्याचे स्पष्ट झाल्याने, सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त यांना बर्ख़ास्त करण्याची मागणी ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार “निवडणुक आयोगाची” निवड करणाऱ्या “पंतप्रधान, विरोधी पक्षनेते, व सरन्यायाधीशांच्या” त्रिसदस्य समितीतुन, सत्ताधारी भाजपने सरन्यायाधीशांना वगळून त्या ऐवजी केंद्रीय गृह मंत्री अमित शहांना घेतले. तेथेच भाजप नेतृत्वाचा स्वार्थी व अनैतिक हेतू स्पष्ट झाला होता व त्यातुनच ‘पक्ष फोडाफोडी व चिन्हांचे अन्यायकारक एकतर्फी निर्णय’ घेत, विविध राज्यांच्या सत्तेवर दरोडा घालण्यात सत्ताधारी भाजप यशस्वी ठरत होता.
देशात संविधानीक लोकशाही धोक्यात आली असतांनाच लोकशाही’चे २ स्तंभ (प्रशासकीय घटक असलेले २ सह निवडणूक आयुक्त व जागरूक माध्यामाच्या भुमिकेत असलेली (इंडीयन एक्स – लोकसत्ता) माध्यमे यांचे मुळे अखेर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मनमानी, वोट चोरी व ‘संविधानीक लोकशाही प्रक्रियेचे खच्चीकरण’ चालत आल्यांचा निंदनीय व घृणास्पद प्रकार अखेर स्पष्ट झाला व काँग्रेस नेते व संसदीय विरोधी पक्ष नेते राहुल जी गांधी यांच्या आरोपांना अखेर पृष्टी मिळाली असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले..!

“महाराष्ट्रात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत” एकुण ४८ पैकी (सु.२/३) ३१ जागा “काँग्रेस-इंडीया(मविआ) आघाडीस” मिळाल्या व १७ जागा भाजप महायुतीस मिळाल्या, मात्र केवळ काही महीन्यांच्याच् नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सु ४१ लाख मतदारांची वाढ होऊन व सायं ५॥ नंतरचे मतदान मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी कोणतीही समर्पक उत्तरे वा सायंकाळ नंतर चे सीसी टीव्ही फुटेज ही न देता.. वादातीत निकालाद्वारे भाजप महायुतीस सरकार बनविण्यासाठी मदत केल्याचा आरोप ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांना दिलेल्या निवेदनात केला…!!
—————————-///——-

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी