-पेशवेकालीन श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रांगोळी व दीपोत्सवत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘जगप्रसिद्ध श्री संत निमकरोली बाबा’ यांची रांगोळी

पुणे : रविवार पेठेतील श्री लक्ष्मीनारायण मंदिर (क्रमांक ६६९) हे पेशवेकालीन कालखंडातील प्राचीन मंदिर असून हंड्या आणि झुंबरांनी सुसज्ज असे हे मंदिर भाविकांचे आकर्षण ठरले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रंगावली, दीपोत्सव यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कलाकार संजय मोडक आणि गौरी गुमास्ते यांनी ‘सद्गुरू श्री निमकरोली महाराज’ यांचे स्वरूप ८ बाय ४ फूट आकाराच्या रांगोळीत हुबेहुब साकारले असून,संत निमकरोली बाबा हे मारुतीचे भक्त असून उत्तराखंड येथील नैनिताल जवळ कैचीधाम येथे त्यांचे वास्तव्य होते. भारतीय लोकांबरोबर अनेक पश्चिमात्य लोक महाराजांचे भक्त आहेत.

ही रांगोळी काढण्यासाठी पाच किलो रंग व रांगोळी वापरली आहे, तसेच सुमारे पाच तास ही रांगोळी काढण्यासाठी लागले. मंदिरातील पुरातन कारंजे देखील यानिमित्त सुरू ठेवण्यात आले. पहाटे श्री लक्ष्मीनारायणास महा-अभिषेक करून नविन पोशाख परिधान करण्यात आला. देवतांची फुलांनी सुंदर आरास देखील करण्यात आली. सायंकाळी दीपोत्सव साजरा करून त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव भक्तिभावाने साजरा झाला.

मंदिरात श्री गोकुळाष्टमी, श्रीराम नवमी आणि त्रिपुरी पौर्णिमा हे वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतात. मंदिराचे व्यवस्थापन गेल्या अनेक पिढ्यांपासून येथील वहिवाटदार पुजारी देवेश गुमास्ते आणि गौरी राहुल गुमास्ते हे निष्ठेने व सातत्याने करत आहेत.

  • फोटो ओळ : रविवार पेठेतील श्री लक्ष्मीनारायण मंदिर (क्रमांक ६६९) या पेशवेकालीन कालखंडातील प्राचीन मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रांगोळी व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button