नवीन ओळख कंपनीचे नवकल्पना, ग्राहक भागीदारी तसेच फार्मास्युटिकल ड्रग कंटेनमेंट आणि डिलिव्हरी सोल्यूशन्सवरील लक्ष अधिक दृढ करते
मुंबई, 28 ऑक्टोबर 2026:
शॉट पूनावाला प्रायव्हेट लिमिटेड चे नाव आता शॉट फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असे करण्यात आले आहे.
28 ऑक्टोबर 2026 पासून, शॉट पूनावाला प्रायव्हेट लिमिटेड हे शॉट फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यरत होईल. कंपनीच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा नवा टप्पा असून, त्यामुळे जागतिक शॉट फार्मा संस्थेशी तिची जोड अधिक मजबूत होईल.
ही नवीन ओळख जागतिक शॉट फार्मा नेटवर्कमधील भारतातील व्यवसायाचे स्थान आणि फार्मास्युटिकल तसेच बायोटेक उद्योगांसाठी उच्च-गुणवत्तेच्या ड्रग कंटेनमेंट आणि डिलिव्हरी सोल्यूशन्सच्या प्रगतीतील त्याची भूमिका अधिक स्पष्टपणे अधोरेखित करते. भारतातील कंपनीची मजबूत उत्पादन क्षमता, ग्राहकांसोबतचे दीर्घकालीन संबंध आणि सखोल बाजारपेठीय अनुभव यांना शॉट फार्मा च्या जागतिक क्षमता, नवकल्पना आणि वैज्ञानिक उत्कृष्टतेची जोड देणारी ही ओळख आहे.
ग्राहक, भागीदार आणि कर्मचाऱ्यांसाठी हा केवळ नावातील बदल आहे, बांधिलकीतील नाही. मालकी हक्क, व्यवस्थापन, कर्मचारी, व्यवसाय धोरण, कार्यपद्धती, उत्पादने, सेवा किंवा विद्यमान ग्राहकांप्रती असलेल्या वचनबद्धतेमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
हा बदल शॉट फार्मा इंडिया ची भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील ग्राहकांप्रती असलेली दीर्घकालीन बांधिलकी अधिक दृढ करतो आणि त्याचवेळी जागतिक शॉट फार्मा ब्रँडशी अधिक मजबूत व सुसंगत नाते निर्माण करतो.
140 वर्षांहून अधिक वारशावर आधारित, ही नवीन ओळख कंपनीचा वारसा आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षा एका जागतिक नावाखाली एकत्र आणते. नवकल्पना, गुणवत्ता, वैज्ञानिक उत्कृष्टता आणि विश्वास या शॉट फार्मा ची ओळख ठरलेल्या मूल्यांचे ती प्रतिबिंब आहे.
शॉट फार्मा इंडिया हे सातत्य आणि प्रगती या दोन्हींचे प्रतीक आहे. तोच विश्वासार्ह व्यवसाय, त्या त्याच क्षमता आणि तेच मजबूत संबंध कायम ठेवत, आता कंपनी अशा नव्या ओळखीने पुढे जात आहे जी आज आम्ही कोण आहोत आणि भविष्यात कुठे वाटचाल करत आहोत हे अधिक स्पष्टपणे प्रतिबिंबित करते.
शॉट फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक रॉय जोसेफ म्हणाले, “शॉट फार्मा इंडिया हा आमच्या प्रवासातील पुढील अध्याय आहे, जो भारतातील आमची ताकद आणि शॉट फार्मा ची जागतिक नवकल्पना तसेच कौशल्य यांना एकत्र आणतो. आमच्या क्षमता अधिक विस्तारण्याची, फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील भागीदारांसोबतचे सहकार्य अधिक दृढ करण्याची आणि ड्रग कंटेनमेंट व डिलिव्हरी सोल्यूशन्समध्ये प्रगती साधण्याची मोठी संधी आम्हाला दिसत आहे. पुढे जाताना, आमचे लक्ष ग्राहकांसोबत एकत्रितपणे वाढण्यावर आणि जगभरातील रुग्णांपर्यंत महत्त्वपूर्ण उपचारपद्धती सुरक्षित व विश्वासार्हरीत्या पोहोचविण्यास हातभार लावण्यावर कायम राहील.”
“शॉट फार्मा इंडिया रुग्णसेवेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. दरवर्षी 3 अब्जांहून अधिक कंटेनर्सचे उत्पादन करून ही कंपनी दर मिनिटाला सुमारे 7,000 इंजेक्शन्स रुग्णांपर्यंत पोहोचण्यास सक्षम बनवते,” असे शॉट फार्मा इंडिया चे प्रमुख भागधारक असलेल्या शॉट फार्मा AG & Co. KGaA चे सीईओडॉ. ख्रिश्चन मियास यांनी सांगितले. “शॉट पूनावाला वरून शॉट फार्मा इंडिया असे करण्यात आलेले नामांतर आमची धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करते आणि भारताला एक महत्त्वपूर्ण फार्मा हब म्हणून दिलेल्या आमच्या दीर्घकालीन बांधिलकीची पुनर्पुष्टी करते.”
ही नवीन ओळख भारतातील कंपनीच्या मजबूत पायावर आधारित आहे. कोविड-19 महामारीदरम्यान, कंपनीच्या फार्मास्युटिकल वायल्सनी जगभरातील 4.3 अब्जांहून अधिक लसींच्या डोसना पाठबळ दिले, ज्यामध्ये भारतातील 3 अब्ज डोसचा समावेश होता. ग्लास प्री-फिलेबल सिरिंजेस आणि स्टेराइल फॉरमॅट्सची भारतातील एकमेव उत्पादक म्हणून कंपनी स्थानिक पुरवठा क्षमता अधिक बळकट करते. याशिवाय, प्री-फिलेबल सिरिंजेस आणि कार्ट्रिजेसच्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू ठेवत आहे. त्यामुळे बायोलॉजिक्स, बायोसिमिलर्स, GLP-1 आधारित उपचारपद्धती आणि इतर प्रगत इंजेक्टेबल थेरपीजच्या वेगाने विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्याची तिची क्षमता अधिक मजबूत होत आहे.
पुढील काळात, शॉट फार्मा इंडिया फार्मास्युटिकल ड्रग कंटेनमेंट आणि ड्रग डिलिव्हरी सोल्यूशन्स क्षेत्रातील क्षमता विस्तारण्यावर, ग्राहकांसोबत अधिक जवळून सहकार्य करून नवकल्पनांना चालना देण्यावर तसेच कार्यात्मक उत्कृष्टता आणि शाश्वतता अधिक मजबूत करण्यावर भर देईल. ही प्राधान्ये कंपनीला फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपन्यांच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देण्यास मदत करतील, तसेच जागतिक फार्मास्युटिकल मूल्यसाखळीत भारताची वाढती भूमिका अधिक बळकट करण्यासाठी योगदान देतील.