‘बंधू’ भावबंधाचा हृदयस्पर्शी प्रवास२० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

भावा-भावांमधलं नातं म्हणजे प्रेम, विश्वास, त्याग आणि कधीही न संपणाऱ्या जिव्हाळ्याची गोष्ट. या नात्यात कधी असतो न बोलता व्यक्त होणारा आधार, कधी मनात साचलेला अबोला, तर कधी एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी. याच नात्याचे हळवे पदर, त्यातील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांची कसोटी उलगडणारा ‘बंधू’ हा मराठी चित्रपट २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोन भावांच्या नात्याभोवती गुंफलेली ही कथा प्रत्येकाला आपल्या माणसांची,आपल्या कुटुंबाची आणि आपल्या भावासोबतच्या आठवणींची नव्याने जाणीव करून देणारी ठरणार आहे. या आगामी चित्रपटाची पुण्यात प्रेस कॉन्फरन्स पार पडली. यावेळी अभिनेता उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी, चित्रपटाचे प्रस्तुकर्ते रजत बेदी आणि दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांसोबतच इतर कलाकारांनी चित्रपटाच्या प्रवासाविषयी आणि त्यामागील भावविश्वाविषयी संवाद साधला.

उपेंद्र लिमये यांनी ‘बंधू’च्या वेगळेपणावर भाष्य करताना, ‘जोगवा’ नंतर मनाला भिडणारी आणि आतून हलवून टाकणारी कलाकृती म्हणजे ‘बंधू’ अशी भावना व्यक्त केली. तर जितेंद्र जोशी यांनी चित्रपटाच्या मूळ भावनेवर प्रकाश टाकत, ‘बंधू’ ही आपल्या मातीतली आणि आपल्या नात्यांशी जोडलेली गोष्ट आहे. ही संपूर्ण टीमची मेहनत आहे,” असे सांगितले.
नोव्हेंबरमध्ये ‘रामायण’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना, ‘बंधू’मध्येही राम-लक्ष्मणाच्या नात्याचा संदर्भ पाहायला मिळणं हा एक सुंदर योगायोग आहे. भावंडांमधील प्रेम, त्याग आणि अतूट नात्याचं भावविश्व उलगडणारा ‘बंधू’ हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिक अनुभव देईल आणि आपल्या नात्यांकडे नव्याने पाहायला प्रवृत्त करेल.” असा विश्वास चित्रपटाचे प्रस्तुकर्ते रजत बेदी यांनी व्यक्त केला. दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना या दोन कसलेल्या कलाकारांसोबत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button