वाद्यवादनातून आंतरिक अव्यक्त ध्वनीकडे नेण्याची ताकद : परमपूज्य स्वामी मकरंदनाथवाद्यवादनातून नादब्रह्माची अनुभूती : परमपूज्य स्वामी मकरंदनाथगोडसे वाद्यवादन विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वरश्री’ अंकाचे प्रकाशन

पुणे : वाद्याचा नाद आहतनाद म्हणून समजला जातो. त्यामध्ये आंतरिक अव्यक्त ध्वनीकडे नेण्याची ताकद आहे. वादन हे सूर आणि शब्दांशिवाय असल्यामुळे ते ईश्र्वराच्या निर्गुण स्वरूपाजवळ जायला मदत करते. श्रोता आणि वादक यांना नादब्रह्माची अनुभूती वादनातून येऊ शकते. एकाग्र श्रवणाने मनाला स्थिरता मिळते. शास्त्रीय गायन आणि वादनातून कलाकारच्या प्राणशक्तीमध्ये शुद्धता येते. त्यात चित्ताचा लय घडविण्यची क्षमता असते. त्यामुळे ते ध्यानासारखे काम करते, असे प्रतिपादन परमपूज्य स्वामी मकरंदनाथ महाराज यांनी केले.

गेल्या सात दशकांहून अधिक, पुणे शहरात अव्याहतपणे, अखंडितपणे आणि पारंपरिकरीत्या संगीत कलेची सेवा करणाऱ्या गोडसे वाद्यवादन विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १६) आयोजित कार्यक्रमाचे उद्‌घाटन आणि ‘स्वरश्री’ अंकाचे प्रकाशन परमपूज्य स्वामी मकरंदनाथ महाराज यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रसिद्ध गायक आनंद माडगूळकर अध्यक्षस्थानी होते. विद्यालयाचे संचालक आनंद गोडसे, क्षमा गोडसे तसेच मधुरा वझे, श्रीराम भट, गांधर्व महाविद्यालय मुंबईचे अध्यक्ष पं. बालासाहेब सूर्यवंशी, स्मिता माडगूळकर, सुनील राडकर मंचावर होते.

परमपूज्य स्वामी मकरंदनाथ महाराज पुढे म्हणाले, संगीत क्षेत्रात तंत्र आणि कौशल्याबरोबरच भावशुद्धतेने समर्पण झाले तर आंतरिक सुख प्राप्त होते. १६ विद्या आणि ६४ कला या परमार्थाकडे नेत असतील, आंतरिक शांती, समाधान मिळवून देत असतील तर त्या कला आणि विद्या देखील धन्य आहेत. संगीताचे सूत्र म्हणजे नियमिपणे साधना, रियाज आणि त्याच बरोबर सहकलाकाराचे एकाग्रतेने श्रवण करून त्याची साथ देणे होय. कलाकाराने आत्मपरिक्षण करीत आपल्या चुका सुधारत शिकणे आणि तन्मयता प्राप्त करणेही गरजेचे आहे.

आनंद माडगूळकर यांनी गोडसे परिवार आणि विद्यालयाशी असलेले ऋणानुबंध उलगडले. उस्ताद फैय्याज हुसेन खानसाहेब, रमाकांत परांजपे, पं. अतुलकुमार उपाध्ये आदी संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

विद्यालयाच्या ७५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा लघुपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडण्यात आला. मान्यवरांचे स्वागत आनंद गोडसे, क्षमा गोडसे यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

सांगितीक कार्यक्रमात अवंतिका साठ्ये यांचे गायन झाले. विद्यालयाचे विद्यार्थी वेणू सदलगीकर यांचे संवादिनीवादन, प्रतिक सूर्यवंशी यांचे बासरीवादन, आनंद जबडे यांचे तबलावादन, शिरीष चरवड यांचे सरोदवादन झाले. तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांनी ‘स्वरबहार’ हा कार्यक्रम सादर केला.

फोटो ओळ : परमपूज्य स्वामी मकरंदनाथ यांचा सन्मान करताना आनंद गोडसे. समवेत मधुरा वझे, क्षमा गोडसे.
फोटो ओळ : गोडसे वाद्यवादन विद्यालयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘स्वरश्री’ विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) मधुरा वझे, परमपूज्य स्वामी मकरंदनाथ, आनंद माडगूळकर, स्मिता माडगूळकर, आनंद गोडसे, क्षमा गोडसे.

प्रति,
मा. संपादक
पुण्यातील प्रथितयश गोडसे वाद्यवादन विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
आनंद गोडसे, संचालक, गोडसे वाद्यवादन विद्यालय
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button