September 24, 2026

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा १३४वा गणेशोत्सव उत्साहात

0
IMG-20260912-WA0022
Spread the love

पुणे : पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचे पहिले श्री कसबा गणपती यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १३४ वर्षे पूर्ण होत असून, गणेशोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवार, १४ सप्टेंबर ते शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमान्य टिळकांनी राष्ट्रजागरणासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत तसेच १५ ते २४ सप्टेंबरदरम्यान सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत श्रींच्या उत्सवमूर्तीचे पूजन व आरती होणार आहे. भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुण्याच्या गणेशोत्सवाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा हा उत्सव भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. मंडळाच्या वतीने सर्व गणेशभक्तांना उत्सवात सहभागी होण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

स्थळ : श्री कसबा गणपती मंदिर, पुणे
आयोजक : श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी