September 24, 2026

पुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले’निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालन

0
IMG-20260829-WA0133
Spread the love

पुणे: ठाण्यात लाखो ग्राहकांची मने जिंकल्यानंतर ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’ या येवला पैठणीच्या अग्रगण्य ब्रँडने पुण्यात आपले नवे दालन सुरु केले आहे. भांडारकर रस्त्यावर पुणेकर ग्राहकांसाठी सुरु झालेल्या या भव्य दालनाचे उद्घाटन नुकतेच राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनावेळी ‘निरुपाज्’च्या संस्थापिका निरुपा तायडे, त्यांच्या मातोश्री वंदना वझारे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ईशम तायडे, दिलीप खैरे, धिरज वझारे, गणेश डोके, महेश गायकवाड, योगिता गायकवाड, तुषार खैरे, सारंग मगर, वैशाली डोके, रोहित डोके आदी उपस्थित होते.

डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ‘निरुपाज्’च्या कलाकुसरीच्या, मनमोहक साड्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देऊन ‘निरुपाज्’च्या या साड्या तयार करतेय, ही कौतुकाची बाब आहे. हातमाग उद्योग आणि स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. भारतीय महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला साड्यांचा व्यवसाय मोठा असून, साड्या विणणे ही एक कला आहे. या कलेला प्रोत्साहन देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. येत्या काळात रेल्वेस्थानकांवर वस्त्रदालने, स्थानिक हस्तकला उत्पादने यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. या उपक्रमांमुळे पारंपरिक कला आणि व्यवसायांचे जतन होण्याबरोबरच ते पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.”

निरुपा तायडे म्हणाल्या, “या दालनात येवल्याची अस्सल पैठणी आणि सिल्कच्या विविध प्रकारच्या साड्यांचे कलेक्शन असणार आहे. निरुपाज् साडीचे पुण्यातील हे पहिलेच दालन आहे. येथे दोन हजारांपासून सात लाख रुपयांपर्यंतच्या हातमाग साड्या आहेत. पारंपरिक येवला पैठणी, बनारसी, सिल्क, पटोला अशा पारंपरिक साड्यांबरोबरच जरदोसी वर्क, मोती वर्क केलेल्या साड्याही आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘निरुपाज्’ची ब्रँड अँबेसेडर असून, नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर प्राजक्ताने ‘निरुपाज्’ची साडी परिधान केली होती.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी