August 5, 2026

सुजय प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर, आयुर्वेदिक तपासणी व सन्मान सोहळ्याचे आयोजन

0
IMG-20260805-WA0019
Spread the love

पुणे : सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्याच्या उद्देशाने सुजय प्रतिष्ठान, मैत्री रक्ताची यांच्या वतीने कै. सुजय सुरेश सकपाळ यांच्या १३ व्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिर, आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उद्यान मंगल कार्यालय, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे.अशी माहिती पत्रकार परिषदेत सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक मा. श्री. सुरेश ग. सकपाळ यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार भवन ला झालेल्या पत्रकार परिषदेत
श्री. किसन भोसले – (प्रसिद्ध उद्योजक),डॉ. विठ्ठल जाधव (IPS– विशेष पोलीस महानिरीक्षक सेवानिवृत्त), श्री सुनील मोरे,श्री हेमंत सोनवणे,श्री सागर भंडारी,श्री हरिभाऊ सपकाळ,श्री. सुधीर सकपाळ – (संस्थापक, सुजय प्रतिष्ठान – मैत्री रक्ताची), उपस्थित होते.

या उपक्रमात नागरिकांसाठी भव्य रक्तदान शिबिर, मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी, अल्पदरात आयुर्वेदिक औषधांचे वितरण तसेच मोफत कांस्यथाळी मसाज यांची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे युवकांसह सर्व नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. किसनजी भोसले हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), मा. श्री. शिवकुमारजी साळुंखे (आयआरएस) तसेच डॉ. विठ्ठल जाधव (आयपीएस), विशेष पोलीस महानिरीक्षक (सेवानिवृत्त) उपस्थित राहणार आहेत. याशिवाय प्रशासकीय, सामाजिक, वैद्यकीय, चित्रपट, पत्रकारिता, उद्योग, शिक्षण आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.

कार्यक्रमादरम्यान समाजसेवा, रक्तदान, पत्रकारिता, शिक्षण, कला, गायन, सामाजिक कार्य आदी क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ‘सेवारत्न’ व ‘समाजगौरव’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचाही विशेष सन्मान करण्यात येणार असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण उभे करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

या उपक्रमासाठी ग्रामविकास मंडळ-गांजवणे, पोलादपूर तालुका रहिवासी संघ, शांतिदूत परिवार, कोकणवासीय महासंघ, एस.एस. धोत्रे फाउंडेशन, युवा अस्मिता फाउंडेशन, विश्व हिंदू मराठा संघ, जनकल्याण फाउंडेशन, संकल्प सारथी संस्था, कोकण भूमिपुत्र/कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठान, अखिल कोकण युवा संघ पुणे शहर, गावदेवी प्रतिष्ठान-गांजवणे यांसह अनेक सामाजिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन सुजय प्रतिष्ठानचे संस्थापक मा. श्री. सुरेश ग. सकपाळ व सुधीर ग. सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, समाजातील सर्व नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहून समाजोपयोगी कार्याला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सुजय प्रतिष्ठान, मैत्री रक्ताची यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी