August 4, 2026

सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूलमध्ये ‘आकार आणि सर्जनशीलता’ प्रदर्शन; विद्यार्थिनींची कल्पकता ठरली आकर्षण

0
IMG-20260803-WA0028
Spread the love

पुणे : सेंट अरनॉल्ड सेंट्रल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी विज्ञान, पर्यावरण, शेती, उद्योग आणि शिक्षण या विविध विषयांवर आधारित प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थिनींनी कल्पकता, सर्जनशीलता आणि अभ्यासपूर्ण मांडणीचा उत्कृष्ट संगम सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

प्रदर्शनातील विविध स्टॉल्समध्ये “Two-dimensional Shapes” या विषयावरील प्रकल्प विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. रंगीबेरंगी कागदापासून तयार करण्यात आलेले वर्तुळ, त्रिकोण, हृदय, तारे आदी विविध आकारांचे मॉडेल्स तसेच स्मितहास्य करणाऱ्या घड्याळाचे आकर्षक मॉडेल पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होते.

या स्टॉलवर विद्यार्थिनी अद्विका कांबळे हिने आपल्या सहविद्यार्थिनींसह प्रकल्पाचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थिनींनी विविध आकारांचे महत्त्व, त्यांचा दैनंदिन जीवनातील उपयोग आणि त्यामागील संकल्पना उपस्थितांना समजावून सांगितल्या.

प्रदर्शनाला शाळेचे प्राचार्य फादर सुनील तसेच वर्गशिक्षिका सीमा अजय मॅडम यांनी भेट देऊन विद्यार्थिनींच्या प्रकल्पांची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेचे, कल्पकतेचे आणि परिश्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.

यावेळी प्रदर्शनात विद्यार्थिनींनी तयार केलेली हस्तकला, “Shaped Monuments” आणि “Shape Faces” यांसारखे आकर्षक शैक्षणिक पोस्टर्सही प्रदर्शित करण्यात आले होते. प्रदर्शनाला शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी