श्री स्वामी बॅग्ज व शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने २५ हजार तुळशी,फळझाडे,फुलझाडे व औषधी रोपांचे वाटप.
पुणे (दि.२२)श्री स्वामी बॅग्ज व शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे मोफत तुळशी रोप व औषधी रोपांचे वाटप करण्यात आले. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी श्री स्वामी बॅग्जचे संचालक राहुल जगताप, शांतीनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक परदेशी, वैभवी जगताप, प्रणोती जगताप, वेदांत पांचाळ, साहिल उणेचा, सर्वज्ञ परदेशी, प्रतिक पेडामकर आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व भाविक नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना राहुल जगताप यांनी पर्यावरणाचे रक्षण करणे ही संतांची शिकवण आहे.त्याला अनुसरूनच या उपक्रमाचे आयोजन केल्याचे नमूद केले.
