April 28, 2026

-‘अ‍ॅन इव्हिनिंग वीथ अ‍ॅकॉर्डियन’ मधून घडणार अ‍ॅकॉर्डियन विश्वाची जादुई सफरजागतिक अ‍ॅकॉर्डियन दिनानिमित्त आयोजन : अ‍ॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांचे सादरीकरण

0
IMG-20260428-WA0034
Spread the love

पुणे : जागतिक अ‍ॅकॉर्डियन दिनानिमित्त अ‍ॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांचा अ‍ॅन इव्हिनिंग विथ अ‍ॅकॉर्डियन हा विशेष कार्यक्रम शनिवार, दिनांक २ मे रोजी सायंकाळी ५.४५ वाजता कोथरूड येथील एमईएस बालशिक्षण आॅडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अ‍ॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिनांक ६ मे १८२९ रोजी सायरील डेमियन यांनी अ‍ॅकॉर्डियन वाद्याचे पेटंट दाखल केले होते. त्या स्मरणार्थ दरवर्षी ६ मे हा दिवस वर्ल्ड अ‍ॅकॉर्डियन डे म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पुण्यात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात अमित वैद्य अकॉर्डियन वादन करणार असून त्यांना पद्माकर गुजर (ढोलक) आणि विनोद सोनवणे (आॅक्टोपॅड) साथसंगत करणार आहेत.

यावर्षी ज्येष्ठ अभिनेते राज कपूर (२०२४), ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी (२०२५) आणि ओ. पी. नय्यर (२०२६) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा कार्यक्रम त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात राज कपूर यांच्या चित्रपटांतील आणि अ‍ॅकॉर्डियनचा प्रभावी वापर असलेल्या गाण्यांसह सलील चौधरी व ओ. पी. नय्यर यांच्या निवडक गीतांचे सादरीकरण होणार आहे. या तिन्ही दिग्गजांचा जीवनप्रवास आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान यावर सुहास किर्लोस्कर आपल्या निवेदनातून प्रकाश टाकणार आहेत.

अमित वैद्य म्हणाले, सन २०११ पासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून यंदाचा कार्यक्रम हा आठवा आहे. प्रत्येक कार्यक्रमातून अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. आयटी क्षेत्रात कार्यरत असलेले अमित वैद्य यांनी अ‍ॅकॉर्डियन वादनाची कला छंद म्हणून जोपासली आहे. या वाद्याचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि सांगीतिक मूल्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने ते या कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी