KV Note | C85पोको भारतात ९ डिसेंबरला सी८५ ५जी लाँच करणार: फ्लॉण्ट युअर
पॉवरसाठी डिझाइन करण्यात आला आहे
नवी दिल्ली, डिसेंबर ३, २०२५: पोको या भारतातील आघाडीच्या कार्यक्षमता-संचालित स्मार्टफोन
ब्रँडने आज पोको सी८५ ५जी च्या लाँचची घोषणा केली. हा ब्रँडच्या २०२५ उत्पादन लाइनअपमधील
शेवटचा स्मार्टफोन असण्यासोबत कार्यक्षमता-केंद्रित सी सिरीजमधील नवीन डिवाईस आहे. भारतातील
सतत व्यस्त असलेल्या तरूणांसाठी डिझाइन करण्यात आलेला पोको सी८५ मध्ये विश्वासार्ह पॉवर,
विश्वसनीयता आणि दिवसभर कार्यरत राहण्याची क्षमता आहे. फ्लॉण्ट युअर पॉवरसाठी या
डिवाईसमध्ये सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
बॅटरी नाविन्यता पोकोची सर्वात प्रमुख खासियत आहे. ग्राहकांच्या स्मार्ट ऊर्जा कार्यक्षमता, जलद
चार्जिंग आणि सडपातळ, पण दीर्घकाळापर्यंत टिकणाऱ्या डिवाईसेसप्रती अपेक्षा बदलत असताना पोको
श्रेणीचे नेतृत्व करत आहे. यंदा एफ७, एक्स७ सिरीज आणि एम७ प्लस अशा लाँचेससह ब्रँडने बॅटरी
कार्यक्षमतेसाठी उद्योग मापदंडांना सतत नव्या उंचीवर नेले आहे. हा ट्रेण्ड पोको सी८५ ५जी ला अधिक
प्रबळ करतो.
पोको सी८५ ५जी तरूण स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन
करण्यात आला आहे, जेथे विश्वसनीयता, दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणा आणि स्टाइलवर लक्ष केंद्रित
करण्यात आले आहे. आकर्षक ड्युअल-टोन फिनिश आणि स्लीक, स्लिम प्रोफाइलसह पोको सी८५ ५जी
भारतीयांच्या व्यस्त जीवनशैलीशी जुळण्याकरिता डिझाइन करण्यात आला आहे. या डिवाईसमधील
उच्च क्षमतेची ६००० एमएएच बॅटरी, तसेच ३३ वॅट फास्ट चार्जिंग आणि १० वॅट रिव्हर्स चार्जिंग
डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्याची खात्री देतात, तसेच हा डिवाईस सहजपणे हातामध्ये मावतो.
वापरकर्त्यांना सामान्य वापरासह बॅटरी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहण्याची खात्री मिळते,
ज्यामुळे हा विश्वासार्ह सोबती आहे आणि डिवाईसला सतत चार्जिंग करण्याची गरज भासत नाही.
केव्ही अनावरणाचा भाग म्हणून आज पोको इंडियाच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर पोको सी८५ ५जी
चा पहिला लुक लाइव्ह प्रसारित करण्यात आला आहे. स्मार्टफोन अधिकृतरित्या भारतात मंगळवार, ९
डिसेंबर २०२५ रोजी लाँच करण्यात येईल.
