February 15, 2026

-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म सार्धसप्तशती वर्षानिमित्त यशोधन महाराज साखरे यांची कीर्तनमालाशाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन : सावकार बुवा यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

0
IMG-20251201-WA0033
Spread the love

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म सार्धसप्तशती वर्षानिमित्त ह. भ. प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांची कीर्तनमाला दि.३ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत ऐतिहासिक लालमहाल, पुणे येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवादरम्यान कीर्तनकोविद ह. भ. प. स्व. कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार प्रदान समारंभ शुक्रवार, दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. पुरस्कार श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती (करवीर पीठ) यांच्या हस्ते ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. विष्णुपंत रामकृष्ण चिद्रवार उर्फ सावकार बुवा यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने, श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने व वै. ह. भ. प. डॉ. किसन महाराज साखरे यांच्या स्मरणार्थ ‘पुणे कीर्तन महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. पुणे कीर्तन महोत्सवाचे हे सतरावे वर्ष असून, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म सार्धसप्तशती निमित्त तीन दिवस ह. भ. प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांची वारकरी कीर्तने रंगणार आहेत.

महोत्सवाचे उद्घाटन ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून, उद्घाटन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते, तसेच पुणे पीपल्स को-ऑप. बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. मानाचे वस्त्र, पुणेरी पगडी, स्मृतीचिन्ह व रोख ११ हजार असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. शिरीष मोहिते, ह. भ. प. प्रा. संगीता मावळे व ह. भ. प. मंगलमूर्ती औरंगाबादकर यांनी कीर्तन महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी