February 15, 2026

माता -पिता कृतज्ञता सन्मान सोहळा.

0
IMG-20251104-WA0017
Spread the love


महोदय,, कलाकारांचा सन्मान होतो,, पण त्या कलाकारांना ज्यांनी जन्म दिला,, वाढवलं त्या माता -पित्यांचा सन्मान कोण आणि कधी करणार? या भावनेने दि. ५ नोव्हेंबर २०२५,, (मराठी रंगभूमी दिनानिमित्त ),,बालगंधर्व परिवार, ट्रस्ट महाराष्ट्र या संस्थेचे मा. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या मार्गदर्शनाने *बालगंधर्व रंगमंदिर, पुणे *येथे दुपारी १२. ३० ते ३. ३० या वेळेत हा सोहळा संपन्न होणार आहे.सुमारे ४० माता-पित्यांचा सन्मान होणार असून,, कलेच्या विविध घटकातील (नृत्य,, वादक,, नेपथ्य,, रंगभूषा,, तमाशा कलावंत,, लोकधारा,,),, यातील १० गरजू कलाकारांना परिवाराच्या वतीने आर्थिक मदत देखील करण्यात येणार आहे.
अयोध्या येथे श्री रामलल्ला च्या गर्भगृहात कीर्तन करणारे एकमेव कीर्तनकार “”जगदगुरुकृपान्कीत डॉ. चेतनानंद महाराज “”यांच्या शुभहस्ते हे सन्मान होणार आहेत. या प्रसंगी डॉ. केतन जोगळेकर,, सिने अभिनेत्री आणि अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या CEO दिपाली कांबळे,, सिने अभिनेत्री स्मिता मधुकर,, वैशाली जाधव,, लता शर्मा -आखाडे हे प्रमुख पाहुणे आहेत.
तरी कृपया आपण आपल्या वृत्तपत्रातून सदरील सोहळ्याला प्रसिद्धी द्यावी,, तसेच आपला प्रतिनिधी या सोहळ्यासाठी पाठवावा ही नम्र विनंती.
आपला
मेघराज राजेभोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी