लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नियोजनासाठी आढावा बैठक संपन्नपुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर दालनात गुरुवारी आढावा बैठक पार पडली. जयंती सोहळा शिस्तबद्ध, भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, सन्माननीय सभासद वृषाली रिठे...
