September 16, 2026

भगवान वराह जयंतीनिमित्त पुण्यात भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न

0
IMG-20260913-WA0078
Spread the love

पुणे : भगवान श्री वराह जयंतीनिमित्त सकल हिंदू समाज, पुणे यांच्या वतीने रविवारी (१३ सप्टेंबर) भवानी पेठ परिसरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. कस्तुरे चौक येथून सुरू झालेल्या  मिरवणूकीचा समारोप  श्री बालाजी मंदिर, भवानी पेठ येथे झाला. 

ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मिरवणुकीदरम्यान भगवान श्री वराह देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकजुटीचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

भगवान विष्णूंच्या वराह अवताराची कथा पृथ्वीच्या संरक्षणाशी जोडली जाते. या पार्श्वभूमीवर वराह जयंतीच्या माध्यमातून पृथ्वी संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि भूमीच्या महत्त्वाचा संदेश देण्यात आला. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे आवाहन करण्यात आले. तसेच भूमी संवर्धन आणि सेंद्रिय शेतीचा संकल्प करण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी