September 8, 2026

आता मराठीतून शिका एआय टूल्सचा वापर

0
IMG-20260904-WA0008
Spread the love

कोर्सिटच्या माध्यमातून सुमारे १०० अभ्यासक्रम उपलब्ध होणार विनामूल्य

पुणे, ३ सप्टेंबर: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अटल इनक्युबेशन सेंटर व रयत शिक्षण संस्थेच्या सेंटर फॉर इनव्हेंशन, इनोव्हेशन अँड इनक्युबेशन मध्ये इन्क्युबेटेड असलेली क्लिकस्किल्स एडटेक ही स्टार्टअप आपल्या कोर्सिट (Korsit) या अपस्किलिंगसाठी असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळे एआय टूल शिकवण्याचे सुमारे १०० अभ्यासक्रम संपूर्णतः विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती कोर्सिटचे संस्थापक प्रथमेश सखदेव यांनी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

प्रथमेश सखदेव म्हणाले, “ज्या भाषेत व्यक्ती विचार करते, त्याच भाषेत त्या व्यक्तीला माहिती तंत्रज्ञान शिकता आले पाहिजे, या साध्या संकल्पनेवर कोर्सिट हा डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. एआय बरोबरच माहिती तंत्रज्ञान व डिजिटल मार्केटिंग या विषयांशी संबंधित अभ्यासक्रम देखील कोर्सिटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.”

नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आणि करिअरच्या चांगल्या संधी मिळविण्यासाठी भाषेचा अडथळा ठरू नये, हा आमचा प्रयत्न आहे. मराठीतील अभ्यासक्रमांसोबतच मार्गदर्शक (मेंटर्स), ई-मेल आणि व्हाटसअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्यावरही आम्ही भर देत आहोत. एआयशी संबंधित सुमारे १०० अभ्यासक्रम विनामूल्य उपलब्ध करून देण्याची आमची योजना आहे. त्यापैकी २५ अभ्यासक्रम सध्या उपलब्ध असून उर्वरित ७५ अभ्यासक्रम २०२६च्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत. एआयच्या या विनामूल्य अभ्याक्रमांसोबतच माहिती तंत्रज्ञान व डिजिटल मार्केटिंग संबंधी अभ्यासक्रम देखील अत्यंत परवडणाऱ्या अशा दरात उपलब्ध असतील, अशी माहिती देखील सखदेव यांनी यावेळी दिली.

“माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग व एआय क्षेत्रातील ज्ञान मोठ्या प्रमाणात इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, त्यामुळे मराठी भाषेत अधिक सहजतेने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नव्या कौशल्यांचा शोध घेणाऱ्या व्यावसायिकांना नवीन संकल्पना समजून घेणे, कौशल्ये आत्मसात करणे आणि त्यातून करिअरच्या नव्या संधी मिळविणे आव्हानात्मक ठरू शकते. हीच महत्त्वाची उणीव दूर करण्याचा प्रयत्न कोर्सिटच्या माध्यमातून केला जात आहे,” असे प्रथमेश यांनी सांगितले.

भविष्यात अन्य प्रादेशिक भारतीय भाषांमध्येही अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची कोर्सिटची योजना आहे. परिचित भाषेत ज्ञान उपलब्ध करून दिल्यास नव्या तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील सर्व स्तरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना आणि शिकणाऱ्यांना घेता येईल.

कराडचे मूळ रहिवासी असलेले प्रथमेश साखदेव यांनी व्हीआयटी, पुणे येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयातील अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एमआयटी, पुणे येथून एमबीए मार्केटिंग पूर्ण केले. ते २०१३ पासून वेबविव्हर लॅब्स ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सी चालवत आहेत. वर्ष २०२२ मध्ये त्यांनी क्लिकस्किल्स या उपक्रमावर काम सुरू केले व माहिती तंत्रज्ञान विषयाशी संबंधित १३ अभ्यासक्रम मराठीमध्ये उपलब्ध करून दिले. सुमारे १६००० विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा फायदा घेतला. क्लिकस्किल्स याच उपक्रमाचे पुढे कोर्सिट मध्ये रूपांतर करण्यात आले.

अधिक माहितीसाठी korsit.in

पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’ एकांकिकेलाजयराम हर्डीकर करंडक एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेलापुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌ने सादर केलेल्या ’लाजाळू’ एकांकिकेने बाजी मारत ६१व्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेलां जयराम हर्डीकर करंडक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिक महाविद्यालय यांनी सादर केलेल्या एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेने पटकाविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’ एकांकिकेलाजयराम हर्डीकर करंडक एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेलापुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌ने सादर केलेल्या ’लाजाळू’ एकांकिकेने बाजी मारत ६१व्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. संघाला ५००१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेलां जयराम हर्डीकर करंडक महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिक महाविद्यालय यांनी सादर केलेल्या एरर : ह्युमन डिटेक्टेड या एकांकिकेने पटकाविला.

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी