रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्ती निमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा व रील स्पर्धेचे आयोजन
पुणे, : रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्ती निमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा, पहिले आवर्तन आणि आकर्षक इन्स्टाग्राम रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि तरुणांना सर्जनशीलतेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नू. म. वि. प्रशाला, बाजीराव रोड, पुणे येथे भव्य वाद्यपूजन व पहिले आवर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात पद्मश्री तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा सत्कार मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री, पुणे जिल्हा ) शुभहस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महपौर मंजुषाताई नागपुरे उपस्थित राहणार आहेत. विशेष सहकार्य अपूर्व दत्तात्रय खाडे यांचे लाभणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) यांनी केले आहे. याचबरोबर ट्रस्टतर्फे सदर कार्यक्रमाचे भव्य इन्स्टाग्राम रील स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, प्रथम पारितोषिक ₹५००१, द्वितीय ₹३००१ आणि तृतीय ₹२००१ तसेच ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली रील ट्रस्टच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजसोबत Collaboration करून पोस्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेचा निकाल २८ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असून प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टने पुणे शहरातील सर्व वाद्यप्रेमी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, वादक आणि नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
संजय गायकवाड
9604764228
