July 22, 2026

-दि. १८ जुलै २०२६ जागतिक योगासन स्पर्धेतध्रुव ग्लोबल स्कूलची खेळाडूनिरल वाडेकर हिला दुहेरी मुकुट

0
IMG-20260718-WA0015
Spread the love

पुणे, दि. १८जुलै -उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची इयत्ता ९ वी अ मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी निरल वाडेकर हिने पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकून दुहेरी मुकुट मिळविला आणि आपल्या शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले आहे.

ही स्पर्धा अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आली होती. अतुलनीय लवचिकता, शक्ती, तोल आणि समर्पण दाखवत निरलने जागतिक व्यासपीठावर उल्लेखनीय कामगिरी बजावली तिने हँड बॅलन्स वैयक्तिक विभाग व पारंपारिक रचना विभाग या दोन्ही विभागात सुवर्णपदक जिंकले.

निरलचे हे विलक्षण यश तिची अटळ बांधिलकी, शिस्तबद्ध सराव आणि योगासनाप्रती असलेली आवड यांचे प्रतिबिंब आहे. तिच्या या कामगिरीने तिचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि संपूर्ण ध्रुव ग्लोबल स्कूल परिवार यांना अत्यंत अभिमान वाटला आहे. ध्रुव ग्लोबल स्कूलचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी योगाभ्यासाला विशेष महत्त्व देतात, त्यांच्याच मार्गदर्शनामुळे निरल हिला हे यश मिळाले. त्यांनी निरलचे कौतुक करत, हे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशोवर्धन मालपाणी, अनिष्का मालपाणी व शाळेच्या प्राचार्या शारदा राव यांनी तिच्या या असामान्य कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन करत, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत शाळेचे उत्कृष्टपणे प्रतिनिधित्व केल्याबद्दल तिचे विशेष कौतुक केले. तिची ही कामगिरी युवा विद्यार्थ्यांना जिद्दीने आणि चिकाटीने आपली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. निरलच्या यशामागे तिचे प्रशिक्षक स्वप्नील बालकृष्ण जाधव व किरण महेश वाडेकर यांचे समर्पित मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि अनमोल पाठिंबा यांचा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल शाळेने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. ध्रुव ग्लोबल स्कूलतर्फे निरल हिला पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सुभेच्छा दिल्या.
ध्रुव ग्लोबल स्कूल, उंड्री, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी