विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज,ही तर लोकशाहीची थट्टा … लतेंद्र भिंगारे..
आपल्या न्याय हक्कासाठी लढणारे आंदोलक हे काही गुन्हेगार नसतात याची सत्ताधाऱ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे ते त्यांचेवर झालेल्या अन्यायाविरोधात लोकशाहीच्या माध्यमातून सरकारकडे न्याय मागत असतात मग त्यांचेवर असा अमानुष लाठीचार्ज का केला जातो ? 150 पेक्षा जास्त आंदोलकांवर हा लाठीचार्ज करत असताना त्यातील अनेक आंदोलनकर्ते गंभीर जखमी झाल्याचे चित्र सर्वच प्रसिद्धी माध्यमातून पाहायला मिळत आहे त्यातील एक निषेधार्थ प्रकार घडला तो म्हणजे त्या आंदोलन स्थळी असलेला पोलिस आपल्या राष्ट्रीय तिरंगा ध्वजाने तोंड पुसून तो अक्षरशः फेकून देतानाचे चित्र पहायला मिळाले ही कशाची मस्ती ? हा राष्ट्र ध्वजाचा घोर अपमान आहे यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजेव कारवाई करण्यात आलीच पाहिजे.
गेली काही दिवसांपासून आपल्या न्याय हक्कासाठी दिल्ली येथील जंतर मंतर वरील लाखो आंदोलकांनी पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि योग्य ती चौकशी करून त्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई जावी अशी रास्त मागणी जंतर मंतर येथील सुरू असलेल्या आंदोलकांनी केंद्र सरकारकडे लोकशाहीच्या माध्यमातून केली आहे कारण पेपर फुटी प्रकरणाचा विषय हा संवेदनशील आणि प्रत्येक भारतीय तरुणाच्या भवितव्याचा आहे.
परंतु ” सत्तेसाठी वाट्टेल ते” या सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार अत्यंत नीच आणि हीन पातळीवर गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांना तरुणाईंबरोबर अल्प वयीन मुला मुलीं सहभागी असलेल्या आंदोलकांवर सुद्धा अमानुष व क्रूर पद्धतीने लाठीचार्ज केला हा लाठीचार्ज करण्याचा त्या पोलिस प्रशासनाला कोणी आदेश दिला ? या प्रश्नाकडे गांभीर्याने पहिले पाहिजे कारण असा हा आकस्मित झालेला लाठीचार्ज व पाण्याचा मारा ही लोकशाहीची थट्टा आणि भारतीय संविधानाचा अपमानच आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या अशा बेजबदार पणाच्या व संविधान विरोधी वागण्याचा आणि अमानुष व क्रूर लाठीचार्ज केलेल्या घटनेचा आम्ही क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर निषेध व्यक्त करत आहोत ….
लतेंद्र भिंगारे,अध्यक्ष क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
