July 6, 2026

3/७/२०२६ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरीआशियाई फिन स्विमिंग स्पर्धेतनिया पतंगे हिचा कांस्यपदकांचा चौकार

0
IMG-20260704-WA0042
Spread the love

पुणे
ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या विद्यार्थिनी निया पतंगे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करताना आशियाई फिन स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदकाचा चौकार ठोकला. मलेशियात जागतिक अंडरवॉटर जलतरण महासंघातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने चार कांस्यपदके पटकावत देशासह शाळेचेही नाव उज्ज्वल केले. निया हिने ५० मी. बायफिन,१०० मी. बायफिन, ५० मी. मोनोफिन व १०० मी. मोनोफिन या क्रीडा प्रकारांमध्ये कांस्यपदक मिळविले. विशेष म्हणजे ती दहाव्या इयत्तेत शिकत असली तरीही अभ्यास व जलतरणाचा सराव या दोन्ही गोष्टी नियमितपणे सांभाळत दोन्ही आघाड्यांवर सातत्याने कौतुकास्पद यश मिळवत असते

ध्रुव ग्लोबल स्कूलचे विश्वस्त व संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी तिचे विशेष कौतुक केले. नियाच्या या अभिमानास्पद यशामुळे ध्रुव ग्लोबल स्कूलच्या संपूर्ण परिवारात आनंदाचे वातावरण असून, तिची जिद्द, कठोर परिश्रम आणि खेळाप्रती असलेली निष्ठा याचे हे उत्तम फलित असल्याची अशी भावना त्यांनी व्यक्त केली. नियाच्या या यशामागे तिच्या प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सौ. स्मिता काटवे, सौ. उमा जोशी, सौ. रुपाली अनाप आणि श्री. केशव हजारे यांनी सातत्याने दिलेले प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेचे व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच पालकांनी निया, तिचे प्रशिक्षक आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, भविष्यातही ती अशाच प्रकारे देशासाठी आणि शाळेसाठी गौरवशाली यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी