May 30, 2026

मेडिकव्हर हॉस्पिटल पुणे येथे हृदय शस्त्रक्रियेदरम्यान आलेल्या स्ट्रोक संकटावर यशस्वी मातबहुविशेषज्ञांच्या तातडीच्या समन्वयातून ३५ वर्षीय तरुणाला नवजीवन

0
IMG-20260529-WA0050
Spread the love

पुणे : मेडिकव्हर हॉस्पिटल पुणे येथील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या परिस्थितीत ३५ वर्षीय तरुणाचे प्राण वाचवत आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. “कोआर्क्टेशन ऑफ एओर्टा” (Coarctation of Aorta – CoA) या जन्मजात हृदयविकारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णावर यशस्वी उपचार करताना शस्त्रक्रियेदरम्यान अचानक उद्भवलेल्या स्ट्रोकच्या गंभीर संकटावरही डॉक्टरांनी तातडीने मात केली.

रुग्णाला अनेक वर्षांपासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता. तरुण वयात दीर्घकाळ उच्च रक्तदाब असणे हे अनेकदा गंभीर हृदयविकाराचे लक्षण असू शकते. सखोल तपासण्या आणि अत्याधुनिक इमेजिंग चाचण्यांनंतर रुग्णाला “कोआर्क्टेशन ऑफ एओर्टा” हा जन्मजात विकार असल्याचे निदान झाले. या विकारामध्ये शरीरातील मुख्य रक्तवाहिनी म्हणजे महाधमनी (Aorta) अरुंद होते किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हृदयाला संपूर्ण शरीरात रक्तपुरवठा करण्यासाठी अधिक ताकदीने कार्य करावे लागते.

सामान्यतः हा विकार लहानपणीच निदान होऊन त्यावर उपचार केले जातात. मात्र उपचार न झाल्यास प्रौढ वयात हृदयविकार, अॅन्युरिझम, कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या रुग्णावर तातडीने उपचार करणे आवश्यक होते.

या रुग्णाची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होती. महाधमनीतील अरुंद भाग मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या कॅरोटिड रक्तवाहिन्या आणि डाव्या हाताला रक्तपुरवठा करणाऱ्या सबक्लेवियन रक्तवाहिनीजवळ होता. त्यामुळे स्टेंट बसवताना मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा बाधित होण्याची आणि स्ट्रोक येण्याची शक्यता खूप जास्त होती.

ही अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया डॉ. सूरज पाटील (डीएम कार्डिओलॉजी) यांनी स्थानिक भूल देऊन यशस्वीरित्या पार पाडली. त्यांनी अत्यंत अचूक पद्धतीने स्टेंट बसवून महाधमनीतील रक्तप्रवाह सुरळीत केला. मात्र प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णामध्ये अचानक उजव्या बाजूच्या हातापायात अशक्तपणा आणि बोलण्यात अडचण अशी स्ट्रोकची गंभीर लक्षणे दिसून आली.

स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मेडिकव्हर हॉस्पिटलची “कोड स्ट्रोक” आपत्कालीन प्रणाली तात्काळ सक्रिय करण्यात आली. त्यानंतर डॉ. भगवान आंगे (एमसीएच न्यूरोसर्जरी) यांनी त्वरित हस्तक्षेप करत रुग्णावर “मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी” ही अत्याधुनिक प्रक्रिया केली. या प्रक्रियेमध्ये विशेष कॅथेटरच्या साहाय्याने मेंदूतील रक्तगाठ काढून रक्तपुरवठा पूर्ववत केला जातो.

सुदैवाने, स्ट्रोकचे निदान अतिशय वेगाने झाले आणि काही मिनिटांतच उपचार सुरू करण्यात आल्यामुळे मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान टळले. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली असून त्याच्या हातापायांची हालचाल आणि बोलण्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

ही केस आधुनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये बहुविशेषज्ञांच्या समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी आणि न्यूरोसर्जरी विभागांनी एकत्रितपणे दिलेल्या तातडीच्या उपचारांमुळे गंभीर परिस्थितीतही रुग्णाचा जीव वाचविणे शक्य झाले. मेडिकव्हर हॉस्पिटल पुणे येथे उपलब्ध असलेली अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर आणि जलद प्रतिसाद प्रणाली यामुळे अशा जटिल प्रकरणांमध्येही उत्कृष्ट उपचार परिणाम साध्य होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी