May 29, 2026

नाल्याच्या प्रवाहातील अडथळे त्वरित काढा – सौ. मंजुश्री खर्डेकर.

0
IMG-20260527-WA0034
Spread the love

नाल्यातून मलवाहिनी टाकण्याचे काम त्वरित पूर्ण करावे – पुनीत जोशी, सुनील पांडे, यांची आग्रही मागणी.

दीनानाथ च्या कल्वर्ट बाबत “प्रायमूव्ह” कडून पारदर्शक सर्वे करून अहवाल खुला करणार – संदीप खर्डेकर.

नाल्याच्या प्रवाहातील अडथळे त्वरित काढा आणि नालेसफाई चे काम वेगाने पूर्ण करा अश्या सूचना वारजे कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.या वर्षी जर नाल्याचे पाणी कोणत्याही सोसायटी मध्ये शिरले तर मी स्वतः जनआंदोलन उभारेन व कामचुकार पणा करणाऱ्यांवर कारवाई साठी आग्रही राहीन असेही त्या म्हणाल्या.
म्हात्रे पुल ते राजाराम पुल ह्या डी पी रस्त्यावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्त्याचे व तेथील नाल्यावर कल्वर्ट ( छोटा पुल ) बांधण्याचे काम सुरू आहे.परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून आज ह्या कामाची पाहणी करण्यात आली त्यावेळी दीनानाथ रुग्णालय व मनपा प्रशासनाला योग्य सूचना देण्यात आल्या.
यावेळी नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेवक सुनील पांडे, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, दीनानाथ रुग्णालयाचे डॉ. योगेश भोपे, अभियंता अमोल साने, वारजे कर्वेनगर च्या सहाय्य्क आयुक्त अस्मिता तांबे,उपअभियंता विनायक शिंदे,कनिष्ठ अभियंता नीलाक्षी तडसे, नालेसफाई चे शुभम असवले, कनिष्ठ अभियंता रोहन दिवटे,भाजपा च्या प्रभाग अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे, सुयश गोडबोले, वैभव जमदाडे,मंडल उपाध्यक्ष अनघा जगताप, निलेश घोडके,दिनेश जगताप,शेखर वीर,रुपालीताई मगर यांच्यासह वकीलनगर, सुशीलानगरी,हिमाली, संकुल, संजीवनी व इतर सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक पुनीत जोशी व नगरसेवक सुनील पांडे यांनी नालेसफाई सह नाल्यातून सुरू असलेल्या मलवाहिनीच्या कामाची झाडाझडती घेतली व सर्व प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पुढील आठवड्यात मलवाहिनी टाकण्याच्या कामाची विस्तृत माहिती सादर करण्याबाबत व प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्याबाबत सूचना केल्या.
दीनानाथ रुग्णालयातर्फे बांधण्यात येत असलेल्या कल्वर्ट मुळे नाल्याच्या प्रवाहाला अडथळा येऊन त्याचा फुगवटा होऊन अरुंद नाल्यातील पाणी पावसाळ्यात नाल्यालगतच्या सोसायटीत शिरेल काय याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रायमूव्ह चे अजित ओक यांना संपर्क केला व त्यांनी याबाबत त्वरित पाहणी करून वास्तुनिष्ठ अहवाल देण्याचे मान्य केले. याच ठिकाणी नाल्यातील सिमेंट ब्लॉक व अन्य डबर त्वरित काढावे अशी सूचना संदीप खर्डेकर यांनी रुग्णालय प्रशासनाला केली व ते आम्ही तातडीने करून घेऊ असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.
वकीलनगर मधील ड्रेनेज लाईन मुख्य मलवाहिनीला न जोडल्याने तुंबणाऱ्या मलाबाबत नगरसेवक मंजुश्री खर्डेकर, सुनील पांडे व पुनीत जोशी यांनी प्रशासनास धारेवर धरले व पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करावीत अशी तंबी दिली.
प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सूचना दिल्याबद्दल नागरिकांनी लोकप्रतिनिधीचे आभार मानतानाच ठरल्याप्रमाणे कामं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी