April 28, 2026

धीरेंद्र शास्त्री यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

मुंबई दिनांक 26 – धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे.धीरेंद्र शास्त्री यांचे कौशल्य भविष्य सांगण्याच्या धंद्यात आहे.त्यांनी चुकीचा इतिहास सांगण्याच्या फांद्यात पडू नये.असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी धीरेंद्र शास्त्री यांना लगावला.

धीरेंद्र शास्त्री यांना महाराष्ट्राचा खरा इतिहास माहीत नाही.महाराष्ट्रात अंधश्रद्धेवर मात करणाऱ्या ;जनजागृती करणाऱ्या पुरोगामी संत आणि महापुरुषांचा इतिहास आहे.भविष्य सांगणाऱ्या थोतांड पसरवणाऱ्या बुवांचा नाही तर प्रबोधन करणाऱ्या संत तुकारामांचा फुले शाहू आंबेडकरांचा संत गाडगे बाबांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा महाराष्ट्राला इतिहास लाभला आहे .त्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चक्की वक्तव्य करू नये.त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करावा.असे ना. रामदास आठवले म्हणाले.

         हेमंत रणपिसे. 
         प्रसिद्धी प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी