April 28, 2026

डॉ. व्ही. एन. शिरोडकर सोसायटीत कोट्यवधींचा अपहार

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे : शहरातील भोसले नगर, रेंज हिल्स या उच्चभ्रू परिसरात असलेल्या डॉ. व्ही. एन. शिरोडकर सोसायटीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. सन 2017 पासून ते 2025 पर्यंतच्या कालावधीत अंदाजे एक कोटी रुपयांचा रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोसायटीचे सभासद ॲड. अमोल नारायण भोकरे यांनी केला आहे.

या प्रकरणी अँड. अमोल नारायण भोकरें यांनी संबंधित प्राधिकरणाकडे ( उपनिबंधक सहकारी गृहनिर्माण संस्था, पुणे शहर 1) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासणी अधिकारी नियुक्त करून चौकशी करण्यात आली. प्राथमिक अहवालात अनेक अनियमितता आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच टेस्ट ऑडिट प्रक्रियेतही गंभीर त्रुटी आढळल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तपासादरम्यान बँक स्टेटमेंटसारखी महत्त्वाची कागदपत्रे ऑडिटमध्ये समाविष्ट न केल्याचेही उघड झाले. काही व्यवहारांची नोंद गायब असून नवीन नोंदी संशयास्पद पद्धतीने जोडल्याचे दिसून आले आहे. याशिवाय सोसायटीच्या कामांसाठी दिलेल्या कंत्राटांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. आवश्यक त्या किमान तीन निविदा न काढता कामे देण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, सोसायटीच्या आपत्कालीन निधीतील सुमारे 7.73 लाख रुपये गायब असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच भाडेकरारांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असून, बाजारभावापेक्षा कमी दराने जागा दिल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा भोकरे यांनी केला आहे.

या सर्व प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यांवर कलम 83 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, चौकशी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने सोसायटीच्या सभासदांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

तक्रारदारांनी माहिती मागितल्यावर धमक्या दिल्याचाही आरोप भोकरे यांनी केला असून, या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच अनेक वेळा अर्ज करूनही संबंधित कार्यालयाकडून दखल घेतली जात नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

एकूणच, या प्रकरणामुळे डॉ. व्ही. एन. शिरोडकर सोसायटीतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भोकरे यांच्यासह अन्य सभासदांनी केली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
ॲड. अमोल भोकरे
9822648240

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी