April 24, 2026

प्रभाग समितीचे कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र व्हावे – सौ. मंजुश्री खर्डेकर.

0
IMG-20260423-WA0021
Spread the love

नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात अध्यक्ष पदभार ग्रहण संपन्न.

वारजे कर्वेनगर प्रभाग समितीचे माझं अध्यक्ष म्हणून असलेलं कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र व्हावे असे मत नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मांडले. हे कार्यालय प्रभाग 29,30 आणि 32 मधील नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी तर उपलब्ध राहीलच पण त्याचबरोबर सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी मुक्तपणे येथे त्यांचे म्हणणे मांडू शकतील आणि मी सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन असे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ना.चंद्रकांतदादा पाटील,ना. मुरलीधरअण्णा मोहोळ, ना. माधुरीताई मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह सर्वच नेत्यांनी दिलेली ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडेन असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
आज त्यांनी वारजे कर्वेनगर प्रभाग समितीचे अध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुनील पांडे, भारतभूषण बराटे, नगरसेविका रेशमाताई बराटे, मा.तेजश्री पवळे, मा.हर्षदा भोसले, मा.सायलीताई वांजळे, माजी नगरसेवक दीपक पोटे, भाजपा चे कोथरूड मंडल अध्यक्ष गिरीश खत्री, भाजपा प्रभाग 29 च्या अध्यक्ष ऍड. प्राची बगाटे, पतित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळमकर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, पालक मनोज नायर, परशुराम हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे, नेचर वॉक संस्थेचे अध्यक्ष अनुज खरे, माथाडी कामगार नेते ओंकार कदम,प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, हेमंत भावे, सुयश गोडबोले,जयश्री तलेसरा, संगीताताई शेवडे,कविताताई सदाशिवे, स्वातीताई मानकर,विवेक विप्रदास,जयेश सरनौबत यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजाभाऊ बराटे, सुनील पांडे व दीपक पोटे यांनी ” मंजुश्रीताई ह्या शांत स्वभावाच्या असून कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याची त्यांची हातोटी आहे,त्यांच्या अनुभवाचा आम्हाला निश्चितच उपयोग होईल ” असा विश्वास व्यक्त केला. तर भारतभूषण बराटे व सायलीताई वांजळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ” मंजुश्रीताई आमच्याही भागात लक्ष देतील व शिक्षण समिती अध्यक्ष , तसेच नगरसेविका म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव गाठीशी असल्याने त्याचा सर्वांनाच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.
तर सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांनी देखील त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचे कौतुक करताना ” त्यांच्या सोबत काम करताना त्यांच्या शांतपणे संवाद साधणे, विषय समजून घेऊन त्यावर उपाय शोधणे अश्या समंजस स्वभावा मुळं आनंद वाटतो असे सांगितले.
यावेळी विविध सोसायटीतील नागरिक, अनेक संस्था संघट्नांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो अश्या शुभेच्छा देण्यात आल्या.

आपला,
संदीप खर्डेकर.
मो – 9850999995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी