September 20, 2026

सामाजिक गणेश’ अंतर्गत माती गणपती मंडळातर्फे आरोग्य दूतांचा सन्मान

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


रमणबाग, श्रीराम व नूमवि वाद्य पथकांचा सहभाग ; महिलांसाठी रंगावली स्पर्धेचे देखील आयोजन

पुणे : गणेशोत्सव ही केवळ परमेश्वराची पूजा करण्यासाठी नाही. मानवतेची पूजा करण्यासाठी समर्पित व्हावा, या उद्देशाने तब्बल ९२ वर्षांची परंपरा जपणाऱ्या नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टने ‘सामाजिक गणेश’ संकल्पनेंतर्गत सफाई कर्मचारी व आरोग्य दूत यांचा सन्मान केला. याशिवाय महिलांसाठी रंगावली स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

मंडळाला रमणबाग युवा मंच, श्रीराम पथक व नूमवि वाद्य पथकाची साथ लाभली. वादन फक्त जल्लोषासाठी नाही, तर हे वादन आभार मानण्यासाठी देखील आहे, असा विचार समोर ठेवून ढोल- ताशांचा गजर म्हणजे आरोग्यदूतांच्या मेहनतीला सलाम करण्यात आला.

पाऊस असो, सण असो की सुट्टी सफाई कर्मचारी आणि आरोग्य दूत रस्त्यावर, दवाखान्यात नागरिकांसाठी झटत असतात. कचरा उचलणे, शहर स्वच्छ ठेवणे हे काम सोपे नाही. हे काम म्हणजे खरी सेवा आहे आणि सेवा हाच खरा धर्म आहे. त्यामुळे सामाजिक गणेश या संकल्पनेंतर्गत हा उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात आला. याशिवाय कलात्मक गणेश अंतर्गत महिलांसाठी आयोजित रंगावली स्पर्धेत देखील महिलांनी उत्तमोत्तम रंगावली साकारल्या.

  • फोटो ओळ : तब्बल ९२ वर्षांची परंपरा जपणाऱ्या नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टने ‘सामाजिक गणेश’ संकल्पनेंतर्गत सफाई कर्मचारी व आरोग्य दूत यांचा सन्मान केला. तसेच यावेळी कलात्मक गणेश अंतर्गत महिलांसाठी आयोजित रंगावली स्पर्धेत देखील महिलांनी उत्तमोत्तम रंगावली साकारल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी