सामाजिक कार्यकर्ते किरण सूर्यवंशी यांचा आरपीआय ख्रिश्चन आघाडीत प्रवेश
पुणे : मुंढवा भागातील सामाजिक कार्यकर्ते किरण सूर्यवंशी यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या ख्रिश्चन आघाडीत प्रवेश केला. आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहर सचिव महिपाल वाघमारे , श्याम सडफुले, ख्रिश्चन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ख्रिस्तोफर राजमणी, ख्रिश्चन आघाडीच्या पुणे महिला अध्यक्षा डॉर्थी थॉमस , ख्रिश्चन आघाडीचे पुणे शहर सचिव स्टॅनली नादन, उपाध्यक्ष अरुण पवार, रणजीत शेंडगे, डेव्हिल चांडेकर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना किरण सूर्यवंशी म्हणाले, समाजातील तळागाळातील लोकांसाठी आजपर्यंत काम करत आलो आहे. रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्याने मला एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. आमच्या भागातील गरीब, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मला पक्षाची मदत होणार अशी भावना व्यक्त केली.
