September 21, 2026

दगडूशेठ’ च्या वतीने गणेशोत्सवात ६ हजार भाविकांना आरोग्यसेवाश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; मोफत आयसीयू सह ३ ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा

0
IMG-20260921-WA0001
Spread the love


पुणे : गर्दीमध्ये श्वास घेण्याकरिता झालेला त्रास, चक्कर येणे, रक्तदाबाच्या समस्या तसेच उत्सवकाळात आलेल्या आपत्कालीन आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करीत ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे तब्बल ६ हजार भाविकांना आरोग्यसेवा देण्यात आली. मोफत आयसीयू सह ३ ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा देखील मंदिर परिसर आणि यंदाच्या उत्सवाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षी गणेशोत्सवात वृंदावन मधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. बाप्पाचे दर्शन घेण्याकरिता दररोज लाखो भाविक येत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी केले जात आहे.

उत्सवकाळात ५५ वैद्यकीय तज्ज्ञाची टीम २४ तास कार्यरत आहे. आजपर्यंत प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात ५ हजार ९०० पेक्षा अधिक भाविक आणि आयसीयू मध्ये ९१ पेक्षा अधिक भाविकांवर उपचार करण्यात आले आहे. उपक्रमाचे नियोजन ट्रस्टचे सर्व विश्वस्त, सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले असून ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी हे व्यवस्थापन पहात आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

सिटी पोस्ट, दगडूशेठ गणपती मंदिर व मांगल्य मंगल कार्यालयजवळ सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र आहेत. याशिवाय भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर धनकवडी, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, संचेती हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल शंकरशेठ रस्ता स्वारगेट येथे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे. गणपती मंदिराजवळ महाराष्ट्र राज्य उपसंचालक आरोग्य सेवा पुणे तर्फे २४ तास मोफत व्हेंटिलेटर/ आयसीयू १० बेडची सुविधा देण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने १०८ क्रमांकाच्या ५ रुग्णवाहिका आणि ट्रस्टच्या ४ रुग्णवाहिका उत्सवकाळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य स्वरुपात कार्यरतन आहेत. वैद्यकीय मदत केंद्रावर तसेच रुग्णवाहिकांच्या येथे मोफत औषधे देण्यात येत असून आरोग्य विषयक सर्वतोपरी मदत भाविकांना देण्याची सुविधा ट्रस्टने उपलब्ध करुन दिली आहे.

  • फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवकाळात मोफत आयसीयू आणि आरोग्य सेवा केंद्र उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये तब्बल ६ हजार भाविकांना आरोग्यसेवा देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी