September 20, 2026

दगडूशेठ’ गणपतीला केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने अभिवादनश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ आयोजित गणेशोत्सव

0
IMG-20260917-WA0019
Spread the love


पुणे : केरळ आणि तुळुनाडूमध्ये सांस्कृतिक घटक म्हणून परिचित असलेले केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा हे कर्नाटकातील तुलुनाडू आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षी उत्सव मंडपात गणरायासमोर हे वादन झाले. दरवर्षी या वाद्य वादनाने गणरायाला अभिवादन केले जाते. यंदाचे वादनसेवेचे हे १० वे वर्ष होते.

चेंदा हे केरळ राज्यात उगम पावणारे एक दंडगोलाकार पर्क्यूशन वाद्य आहे. तुळुनाडू (कोस्टल कर्नाटक) मध्ये हे चेंडे म्हणून ओळखले जाते. हे वाद्य केरळमध्ये ३०० वर्षांहून अधिक काळ सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणून ओळखले जाते. असे हे वाद्य पाहण्याचा व वादन ऐकण्याचा आनंद पुणेकरांना या गणेशोत्सवात घेता आला.

  • फोटो ओळ : केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिवादन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षी उत्सव मंडपात गणरायासमोर हे वादन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी