September 20, 2026

-गणेशोत्सवातील १२ स्तंभ सांभाळणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा सन्मानअमित ठाकरे यांच्या हस्ते गौरव ; पुण्याच्या गणेशोत्सवात अमूल्य योगदान

0
IMG-20260921-WA0049(1)
Spread the love

पुणे : गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध स्तरांवर योगदान देणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार पेठेत सन्मान करण्यात आला. गणेशोत्सवातील १२ स्तंभ सांभाळणाऱ्या १२ सेवाभावी व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग आनंद सराफ यांच्या शुक्रवार पेठेतील निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, ढोल-ताशा, मंडप, रांगोळी, मूर्ती रंगकाम, हार-फुले विक्रेते, ऐतिहासिक बत्तीवाले, लोककलाकार, कला दिग्दर्शक, बँड, गणेशोत्सव अभ्यासक, मोदक विक्रेते, छायाचित्रकार, आकाशवाणी निवेदक आणि पत्रकारांचा यावेळी गौरव करण्यात आला.

स्वच्छता कर्मचारी असूनही वकील आणि सर्पमित्र म्हणून कार्य करणारे आनंद अडसूळ, ढोल-ताशा महासंघाचे पराग ठाकूर, मंडप व्यावसायिक सोमनाथ सूर्यवंशी, रांगोळी कलाकार परशुराम वाणी, दगडूशेठ गणपतीच्या प्रिंटिंग व मूर्ती रंगकामाशी संबंधित मुकेरकर, हार-फुले विक्रेते चौधरी, ऐतिहासिक बत्तीवाले वारे बंधू, लोककलाकार शाहीर हेमंत मावळे, कला दिग्दर्शक विजय महामुलकर व वृंदा साठे, शंभर वर्षांहून अधिक काळ बँड क्षेत्रात कार्यरत सोलापूरकर, गणेशोत्सव अभ्यासक स्वप्नील नहार, दररोज ५० हजार मोदक तयार करणारे किशोर सरपोतदार, ज्येष्ठ छायाचित्रकार पत्के, आकाशवाणी निवेदक सुहास धारणे, पत्रकार सुनील जगताप आणि आदर्श गणेशोत्सव मंडळाचे उदय जगताप यांचा सन्मान करण्यात आला.

सत्कारार्थींना फेटा, महावस्त्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. गणेशोत्सवाच्या आयोजनापासून ते त्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक बाजू जपण्यापर्यंत विविध घटकांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

अमित ठाकरे म्हणाले, पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. गणेशोत्सवात समाजाच्या सर्व घटकातील नागरिक सहभागी होतात. त्यामुळे हा उत्सव अधिक उत्तम रीतीने पार पडतो. त्यामुळे उत्सवात सेवा देणाऱ्या या सर्व स्तंभातील सेवाव्रतींचा सन्मान करणारा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी