September 9, 2026

पुणे व्यापाऱ्यांच्या जिएसटी प्रश्नांसाठी भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकार

0
IMG-20260908-WA0041
Spread the love

व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी – अध्यक्ष महेश गुप्ता यांची ठाम मागणी

पुणे : भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी पुणे शहरचे अध्यक्ष महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST), पुणे विभागाचे मुख्य आयुक्त मा. श्री. नीरज कंसल, IRS यांची भेट घेऊन पुणे शहरातील व्यापाऱ्यांच्या जीएसटीसंदर्भातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

व्यापाऱ्यांना दैनंदिन कामकाजात सामना कराव्या लागणाऱ्या जीएसटीविषयक अडचणी, प्रशासकीय प्रश्न तसेच प्रलंबित बाबींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ‘पुणे व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी’ नियुक्त करण्याची प्रमुख मागणी महेश गुप्ता यांनी यावेळी केली. तसेच व्यापाऱ्यांकडे ‘टॅक्स पेयर ऍज ए पार्टनर ’ या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे आणि तक्रारी व अपीलांचा वेळबद्ध निपटारा व्हावा, अशी मागणीही करण्यात आली.

महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे प्रशासनापर्यंत पोहोचविले जात असून, प्रशासन आणि व्यापारी वर्गामध्ये सातत्यपूर्ण समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

“व्यापाऱ्यांना संघर्ष नको, तर संवाद, समन्वय आणि वेळबद्ध समाधान हवे आहे. जीएसटी प्रशासन आणि व्यापारी वर्गामध्ये विश्वासाचे नाते अधिक मजबूत करणे, ही आमची भूमिका आहे. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त झाल्यास अनेक अडचणी तातडीने सोडविण्यास मदत होईल,” असे महेश गुप्ता यांनी स्पष्ट केले.

मुख्य आयुक्त नीरज कंसल यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे सविस्तर ऐकून घेत व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी विक्रम चव्हाण, गजेंद्र देशपांडे, विजय नरेला, सुधींद्र कुलकर्णी, अमर शाह, अभिजीत भोसले, सौ. सुवर्णा शिंदे, अमोल बढे, हरी सोनार, कुमार खत्री, शैलेश भट, सौ. सुनीता निजामपूरकर, झुंजार पाटील, सौ. शीतल कुलकर्णी, करना रेड्डी, गणेश माळी, राजीव लुल्ला, सुमेरसिंह राजपुरोहित यांच्यासह इतर पदाधिकारी व व्यावसायिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी