ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या उपस्थितीतपुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे शुक्रवारी पारितोषिक वितरण
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ६१व्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता भरत नाट्य मंदिरात होणार आहे. पारितोषिक वितरण अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील विद्यार्थी लेखकांच्या संहितांचा अभ्यास करुन त्यावरील प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर करणारे डॉ. विजयकुमार जोशी यांचा महाराष्ट्रीय कलोपासकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभापूर्वी यंदाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरुषोत्तम करंडक पटकाविणारी ‘लाजाळू’ एकांकिका सादर होणार आहे.
