September 9, 2026

-जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसतर्फे १०वा आदर्श शिक्षक पुरस्कार मंगळवारी (दि.८)

0
IMG-20260904-WA0041
Spread the love

यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, रांका ज्वेलर्स प्रा. लि.चे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांची उपस्थिती

पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे १०व्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पुरस्कार वितरण समारंभ न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल-१ च्या सभागृहात होणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या विविध मान्यवरांचा यावेळी आदर्श कुलगुरू, आदर्श संस्थापक, आदर्श प्राचार्य आणि आदर्श प्राध्यापक या पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाचा आदर्श कुलगुरू पुरस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे डॉ. संजीव सोनवणे, आदर्श संस्थापक पुरस्कार मराठवाडा मित्र मंडळ डेक्कन जिमखाना पुणेचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव, आदर्श प्राचार्य पुरस्कार ग. तु. पाटील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय नंदुरबारचे डॉ. महेंद्र रघुवंशी आणि आदर्श प्राध्यापक पुरस्कार सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. पराग सदगीर यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी असतील. तसेच रांका ज्वेलर्स प्रा. लि.चे अध्यक्ष फतेचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त या पुरस्कार वितरण सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते.

माणूस पैशांनी मोठा झाला तरी आपल्या शिक्षकांचे ऋण विसरू नयेत. त्यांचा आदर करणे ही विद्यार्थ्यांची जबाबादारी आहे. अशा शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर त्यांच्यातील कलागुण जोपासण्यासाठी शिक्षणसंस्थेकडून प्रयत्न केले जातात. त्यासाठी वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामधील हा एक कार्यक्रम आहे, असेही अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी