September 9, 2026

-सुवर्णयुग तरुण मंडळ दहीहंडी उत्सव शनिवारी (दि.५)

0
IMG-20260903-WA0058(1)
Spread the love

तब्बल ४० फूट एलईडी वॉलद्वारे राधाकृष्ण लीला दर्शन

पुणे : सुवर्णयुग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव शनिवारी (दि.५) आयोजित करण्यात आला आहे. तब्बल ४० फूट एलईडी वॉलद्वारे गोपाळभक्तांना राधाकृष्ण लीला दर्शन होणार असून दहीहंडी फोडण्याचा मुख्य कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असल्याची माहिती मंडळाचे सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी दिली.

संपूर्ण पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षक असलेला हा उत्सव बेलबाग चौकाजवळ उत्सवाच्या पारंपरिक जागेत होणार आहे. शनिवारी दुपारी ४ ते ६ यावेळेत नादब्रम्ह ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्टचे वादक पारंपरिक वाद्यवादन करणार आहेत. त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा मुख्य कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होईल. दहीहंडी फोडणाऱ्या संघाला रोख रक्कम ५१,००० व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. तरी गोपाळभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी