September 6, 2026

प्रविण भागवत यांना अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते  ‘वासुदेव जीवनदृष्टी गौरव पुरस्कार’ प्रदान

0
IMG-20260902-WA0079(1)
Spread the love

पुणे : वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘वासुदेव जन्मोत्सव सोहळा २०२६’मध्ये पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १४ फीट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भागवत यांना कै. विनायकराव निमदेव स्मृतीप्रीत्यर्थ ‘वासुदेव जीवनदृष्टी गौरव पुरस्कार’ सिटी कॉर्पोरेशनचे एम. डी. अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वतीने प. पू. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘वासुदेव जन्मोत्सव सोहळा २०२६’ भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे झालेल्या या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.  यावेळी वेद वासुदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित कृष्ण तुकदेव, अनिरुद्ध चिवटे, अविनाश कुळकर्णी , स्मिता घळसासी,  नीलिमा चिवटे आदि मान्यवर उपस्थित होते. 

सोहळ्याची सुरुवात सकाळी ‘चैतन्य वासुदेव रथ सोहळ्या’ने झाली. त्यानंतर श्रीमद् दत्तात्रय व श्री सत्यदत्त पूजा, महाप्रसाद, जन्मोत्सव कीर्तन, मनोगत तसेच गायनसेवा व करुणाष्टपदी आदी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. जन्मोत्सवानिमित्त परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी