September 6, 2026

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (COEP) प्रकरणावरून ‘एबीपी माझा’चे (ABP Majha) पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर सीओईपीच्या तक्रारीवरून २१ ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात पडताळणी शिवाय पत्रकाराचे नाव जोडल्याचा आरोप करत ते तातडीने वगळण्याची मागणी केली

0
IMG-20260902-WA0007
Spread the love

.माध्यमांचे स्वातंत्र्य: जनहिताची बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांवर असे गुन्हे दाखल करणे म्हणजे माध्यमांच्या स्वातंत्र्याला धक्का असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.या कारवाईमुळे राज्यातील पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पत्रकार संरक्षण समिती पुणे शहर चे शिष्टमंडळानी जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, विभागीय आयुक्त पुणे विभाग शितल तेली – उगले यांची भेट घेऊन चर्चा करून मंदार गोंजारी या पत्रकारांवरील चुकीच्या पद्धतीने दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार संरक्षण समिती पुणे शहर चे अध्यक्ष सुनील शिरसाट, पत्रकार संरक्षण समितीचे पुणे शहर सचिव धनराज खंडाळे, ज्येष्ठ पत्रकार संतोष सागवेकर संस्थापक अध्यक्ष परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघ , स्वप्निल कोठावडे,महिला प्रतिनिधी मंजुषा आवळकंठे इत्यादींच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी