Array ( [data] => ) श्री राघवेंद्र स्वामी महारथोत्सव जल्लोषात साजरा355 व्या आराधना महोत्सवानिमित्त काढलेल्या महा रथयात्रेत हजारो भक्त सहभागी - Sanvidhan
September 1, 2026

श्री राघवेंद्र स्वामी महारथोत्सव जल्लोषात साजरा355 व्या आराधना महोत्सवानिमित्त काढलेल्या महा रथयात्रेत हजारो भक्त सहभागी

0
IMG-20260831-WA0035
Spread the love


पुणे : विविधरंगी पाना फुलांनी सजविलेला रथ, रथामध्ये श्री राघवेंद्र स्वामी यांची चांदीची मूर्ती, धूप आरतीचा सुगंध, पवित्र मंत्रोच्चार ,पारंपारिक वादन गुलालांची उधळण आणि नक्षीदार रांगोळ्यांच्या पायघड्या अशा धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरणात श्री राघवेंद्र स्वामींच्या 355 व्या आराधना महोत्सवानिमित्त भव्य महा रथयात्रा काढण्यात आली. हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या भक्तांचे जयघोष आणि मंत्रोच्चार यांनी या महायात्रेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

श्री राघवेंद्र स्वामींच्या ३५५व्या आराधना महोत्सवाचे आयोजन श्री सदाशिव पेठेतील वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे २९ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत करण्यात आले . यानिमित्त लक्ष्मी रोडवरील राघवेंद्र स्वामी मठ येथून महारथयात्रा काढण्यात आली . शेकडोंच्या संख्येने भाविक या रथयात्रेमध्ये सहभागी झाले होते . नगरकर चौघडा वादन महारथ यात्रेच्या अग्रस्थानी होते त्यानंतर श्रीकृष्ण बँड वर लावण्यात आलेल्या विविध धार्मिक गीतांनी महारथ यात्रेचे वातावरण प्रफुल्लित झाले होते. पारंपारिक वस्त्र परिधान करून महा रथयात्रेमध्ये सहभागी झालेले भक्त गुलालांची उधळण करत श्री राघवेंद्र स्वामी यांचा जयघोष आणि मंत्रोच्चार करत होते. त्यामुळे लक्ष्मी रोडवरील वातावरण भक्तीमय झाले होते.
जगद्गुरु श्रीमन्मध्वाचार्य मूळ महासंस्थानम्, नंजनगुडू यांच्या वतीने तसेच मठाच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा पार पडला.महोत्सवाच्या निमित्ताने ध्वजारोहण, प्राणप्रतिष्ठा, शाकोत्सव, धनधान्य पूजा व लक्ष्मी पूजा आधी धार्मिक विधी करण्यात आले . तसेच उपाकर्म कार्यक्रमांतर्गत ऋग्वेदीय उपाकर्म , यजुर्वेदीय उपाकर्म करण्यात आले.

महारथ यात्रेच्या निमित्ताने राघवेंद्र स्वामी मठाचे व्यवस्थापक श्री दत्तात्रय जोशी गुरुजी म्हणाले भारतरत्न भीमसेन जोशी गानसम्राज्ञ किशोरी आमोणकर रघुनंदन पंशिकर हे कलाकार राघवेंद्र स्वामी यांचे भक्त आहेत त्यांनी संगीताच्या स्वरूपामध्ये राघवेंद्र स्वामी यांची सेवा केली आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्र मध्ये ही श्री राघवेंद्र स्वामी यांचे शिष्यगण वाढत आहेत पुण्यामध्ये अडीचशे वर्षांपासून हा मठ आहे. श्री राघवेंद्र स्वामी यांची शिकवण सर्व दूर पसरावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
आराधना महोत्सवाच्या तीन दिवसांत विविध धार्मिक सेवांचे आयोजन करण्यात आले. सुप्रभात सेवा , पंचामृत अभिषेक , उत्सवाराय पाद्यपूजा व कनकमहा पूजा , त्यानंतर अलंकार, हस्तोदक, महामंगलारती व तीर्थप्रसाद आधी धार्मिक कार्यक्रम झाले .
सायंकाळी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ५ स्वस्तिवाचन, डोलोत्सव व महामंगलारती करण्यात आली .महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांनाही विशेष स्थान देण्यात आले. आनंद भीमसेन जोशी आणि कुमारी सुजाता देवन यांचा दासवाणी कार्यक्रम झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी