September 7, 2026

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात

0
IMG-20260816-WA0034
Spread the love


पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज (दि. १६) ट्रिनिटी अभियांत्रिकी आणि संशोधन पुणे या महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘तुती’ या एकांकिकेने सुरुवात झाली. भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ ते दि. ३० ऑगस्ट या कालावधीत आयोजित स्पर्धेत ५१ संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धेचे यंदाचे ६१वे वर्ष आहे. ‘विशेष म्हणजे …’ (संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य व बा. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय, ‘उकल’ (जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय) या एकांकिका सादर झाल्या. सोमवारी (दि. १७) सायंकाळी ५ ते ८ या वेळात ‘कैदी’ (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ), ‘आगिनफुल’ (डॉ. डी. वाय. पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय), ‘गॅट मॅट’ (इंटरनॅशलन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) या एकांकिका सादर होणार आहेत.
फोटो ओळ : ‘तुती’ एकांकिकेतील एक प्रसंग.
फोटो ओळ : ‘विशेष म्हणजे..’ एकांकिकेतील एक प्रसंग.
फोटो ओळ : ‘उकल’ एकांकिकेतील एक प्रसंग.
प्रति,
मा. संपादक
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आजपासून (दि. १६ ऑगस्ट) सुरुवात झाली. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
महाराष्ट्रीय कलोपासक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी