August 10, 2026

किंमत आणि उपलब्धता सॅमसंग गॅलेक्सी झेड सिरिज स्मार्टफोन्सच्या वेळेपूर्वी डिलिव्हरीची घोषणा

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


पुणे, १० आँगस्ट – सॅमसंगने आज भारतातील डिवाईसेस प्री-बुक केलेल्या ग्राहकांसाठी बहुप्रतिक्षित नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ यांच्या वेळेपूर्वी डिलिव्हरी सुरू करण्याची घोषणा केली. भारतात २२ जुलै रोजी झालेल्या लाँचच्या अवघ्या ७२ तासांच्या आत २,७१,००० हून अधिक प्री-ऑर्डर्स मिळवत गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. याउलट, मागील पिढीच्या गॅलेक्सी झेड फोल्ड७ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप७ साठी समान संख्येने प्री-ऑर्डर्स मिळवण्यासाठी १५ दिवस लागले होते, ज्यामधून फोल्डेबल तंत्रज्ञानाचा मुख्य प्रवाहात सातत्याने होत असलेला स्वीकार दिसून येतो.

सॅमसंगने बेंगळुरू येथील सॅमसंग ऑपेरा हाऊस येथे प्री-बुक केलेले गॅलेक्सी झेड८ सिरीजमधील फोल्डेबल स्मार्टफोन्स घेण्यासाठी जमलेल्या ग्राहकांची गर्दी कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी टोकन-आधारित यंत्रणा लागू केली.
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा: उत्पादकतेसाठी सर्वात प्रगत फोल्डेबल
गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा सॅमसंगच्या सर्वोच्च दर्जाची कार्यक्षमता फोल्डेबल श्रेणीमध्ये घेऊन येतो, ज्यामध्ये मोठा ८-इंच मुख्य डिस्प्ले, प्रगत कॅमेरा सिस्टम आणि आव्हानात्मक वर्कफ्लोसाठी बनवलेले हार्डवेअर एकत्र केले आहे. हा डिवाईस फक्त ४.१ मिमी पातळ आहे आणि याचे वजन २१५ ग्रॅम आहे, ज्यामुळे हे सॅमसंगचे आजवरचे सर्वात स्लिम फोल्ड डिझाइन बनले आहे. एचडीआरसह २०० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि सुधारित नाईटोग्राफीसह नवीन ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स कोणत्याही प्रकाशात अधिक सुस्पष्टता देतात, तर नवीन एपीव्ही कोडेक आणि सिने एलयूटी टूल्ससह ८के व्हिडिओ रेकॉर्डिंग क्रिएटर्सना अधिक नियंत्रण देतात. स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ फॉर गॅलेक्सी प्लॅटफॉर्म आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच बॅटरीद्वारे संचालित हा डिवाईस दिवसभराचे काम आणि कंटेंट निर्मितीला पाठबळ देतो.
गॅलेक्सी झेड फोल्ड८: सर्वोत्तम व्ह्यूइंग अनुभवावर लक्ष केंद्रित करणारा नवीन फोल्डेबल अनुभव
गॅलेक्सी झेड फोल्ड८ क्विक कव्हर-स्क्रीन परस्परसंवादापासून ते अनफोल्ड केल्यावर सर्वोत्तम व्ह्यूइंग, वाचन आणि गेमिंगमध्ये सहजतेने बदल करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटनुसार अनुकूल होतो. फोल्ड केलेले असताना, १०:१६ कव्हर स्क्रीन मेसेजिंग, सोशल मीडिया, वेब ब्राउझिंग आणि शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ पाहण्यासारख्या टास्क्ससाठी डिझाइन केली आहे. अनफोल्ड केल्यावर, ४:३ मुख्य डिस्प्ले गेम्स आणि चित्रपटांसाठी मोठा व्ह्यूइंग एरिया प्रदान करतो आणि १६:९ कंटेंटसाठी न वापरलेली स्क्रीन जागा कमी करतो. रोटेट केल्यावर, या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचे गुणोत्तर लेख आणि ई-बुक्स वाचण्यासाठी अधिक योग्य बनते. ४८०० एमएएच बॅटरीसह फक्त २०१ ग्रॅम वजन असलेला हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात हलका गॅलेक्सी झेड फोल्ड आहे. नवीन फ्लेक्स टायटॅनियम डिस्प्ले स्ट्रक्चर क्रिज दृश्यमानता कमी करते आणि टिकाऊपणा सुधारते, तर मुख्य डिस्प्ले ३००० नीट्सपर्यंतच्या पीक ब्राईटनेसपर्यंत पोहोचतो. सिस्टममधील ड्युअल ५० मेगापिक्सल कॅमेरा, ड्युअल रेकॉर्डिंग आणि माय फॅनकॅम वैशिष्ट्ये विविध सीन्समधील कंटेंट कॅप्चर आणि एडिट करणे सोपे करतात.
गॅलेक्सी झेड फ्लिप८: एआय-नेटिव्ह फ्लिप अनुभव
गॅलेक्सी झेड फ्लिप८ जलद परस्परसंवाद आणि वैयक्तिक अभिव्यक्तीसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, जो एआय-नेटिव्ह फ्लेक्सविंडोभोवती निर्माण करण्‍यात आला आहे, जे कव्हर स्क्रीनवर थेट अॅप्स, माहिती आणि जेमिनी इंटेलिजन्स घेऊन येते. १८० ग्रॅम वजन आणि फक्त ६.१ मिमी पातळ असलेला हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम आणि हलका फ्लिप डिवाईस आहे. सॅमसंगच्या प्रोव्हिज्युअल इंजिनद्वारे संचालित असलेला ५० मेगापिक्सल कॅमेरा तपशीलवार पोर्ट्रेट आणि नैसर्गिक स्किन टोन्स प्रदान करतो, तर फ्लेक्स मोड, होरायझन लॉकसह सुपर स्टेडी, फ्लिपशॉट आणि कव्हर स्क्रीन मिरर हँड्स-फ्री, तसेच कव्हर-स्क्रीन फोटोग्राफीला पाठबळ देतात.
गॅलेक्सी एआय सादर करत आहे अधिक वैयक्तिक आणि प्रोअॅक्टिव्ह अनुभव
नवीन गॅलेक्सी झेड सिरीज गॅलेक्सी एआयच्या पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करते, ज्यामध्ये नाऊ ब्रीफ आणि नाऊ नज वापरकर्त्याच्या दैनंदिन दिनचर्या आणि गरजांवर आधारित संबंधित माहिती आणि सुचवलेल्या पुढील स्टेप्स समोर आणतात. जेमिनी इंटेलिजन्स वापरकर्त्यांना कमी स्टेप्समध्ये विनंतीपासून पूर्ण कामापर्यंत पोहोचण्यास मदत करते, ज्यामध्ये आता ४९ अॅप्लिकेशन्स आणि सर्व्हिसेसमध्ये अॅप ऑटोमेशनला पाठबळ दिले आहे, आणि जेमिनीमधील नोटबुक नोट्स, इमेजेस व रेकॉर्डिंग्जची रचनाबद्ध सारांशांमध्ये मांडणी करते.
अनुभवामध्ये समाविष्ट केलेली सुरक्षा आणि गोपनीयता
नवीन गॅलेक्सी झेड सिरीज गॅलेक्सी एआयमधील विस्तारित गोपनीयता नियंत्रणांसह बहुस्तरीय सुरक्षितता देते. सॅमसंग नॉक्स प्रत्येक डिवाईसला चिप स्तरापासून सुरक्षित करते, ज्यामध्ये नॉक्स एन्हान्सड एन्क्रिप्टेड प्रोटेक्शन आणि नॉक्स वॉल्ट वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवतात. वन युआय ९ चे नवीन एआय असिस्टंट अॅक्टिव्हिटी डॅशबोर्ड वापरकर्त्यांना एआय क्रियांचा सेंट्रल व्ह्यू देते, तर एन्हान्सड प्रायव्हसी अलर्ट्स संभाव्य गोपनीयता जोखमींबद्दल माहिती देऊन अधिक पारदर्शकता आणि नियं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी