August 10, 2026

गायकवाड, शेंडकर यांचा जयमाला शिलेदार गुणगौरव पुरस्काराने सन्मान

0
IMG-20260810-WA0025
Spread the love

पुणे : पद्मश्री जयमालाबाई शिलेदार जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त संगीत रंगभूमी नेपथ्य कलाकार संतोष गायकवाड आणि अष्टपैलू कलाकार सयाजी शेंडकर यांचा जयमाला शिलेदार गुणगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत रंगभूमीसाठी योगदान देणारे प्रदीप रास्ते व लतिका रास्ते यांचाही या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्टच्या प्रमुख दीप्ती भोगले यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर यांनी जयमालाबाई शिलेदार जन्मशताब्दी वर्षानिमित्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांची माहिती दिली आणि सत्कारार्थींचा परिचय करून दिला.
फोटो ओळ : सन्मान सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) वर्षा जोगळेकर, सयाजी शेंडकर, प्रदीप रास्ते, लतिका रास्ते, संतोष गायकवाड, दीप्ती भोगले.
प्रति,
मा. संपादक
पद्मश्री जयमालाबाई शिलेदार जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त जयमाला शिलेदार गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
वर्षा जोगळेकर, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी