-नसरापूर प्रकरणात न्यायप्रक्रियेस मदत करणाऱ्या तज्ज्ञांचा रुद्रगर्जना वाद्यपथकातर्फे सन्मानपथकाचे अनोखे वाद्यपूजन व सराव शुभारंभ
पुणे : नसरापूर बालिका अत्याचार व हत्या प्रकरणाच्या तपासात आणि न्यायप्रक्रियेत मोलाचे योगदान देणाऱ्या अधिकारी व तज्ज्ञांचा रुद्रगर्जना वाद्य पथकातर्फे सत्कार करण्यात आला. रुद्रगर्जना वाद्यपथकाच्या वाद्यपूजनाचा आणि सरावाचा शुभारंभ सिंहगड महाविद्यालय मैदानासमोरील रुद्रगर्जना वाद्यपथकाच्या सरावस्थळी करण्यात आला.
कार्यक्रमाला श्री कसबा गणपती मंडळ तसेच हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे पदाधिकारी, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग विश्वस्त ज्येष्ठ विधिज्ञ प्रताप परदेशी, थायलंड येथील श्री दगडूशेठ गणपती मंदिराचे विश्वस्त चेतन लोढा, अकरा मारुती मंडळाचे विनायक घाटे, उद्योजक हेमंत दांगट आदी उपस्थित होते.
पथकाचे संस्थापक शैलेश निंगुणे, अध्यक्ष राहुल नायर आणि कार्याध्यक्ष तुषार मानकर यांच्या हस्ते हा सत्कार झाला. यंदा पथकाचे १४वे वर्ष आहे. पुण्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करून सामाजिक भान ठेवून उतम आयोजित करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते, सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर प्रणव पलंगे, कोर्ट पोलीस निचित, पोलीस गणेश धनवे, सायबर एक्सपर्ट नचिकेत दांडेकर, फॉरेन्सिक एक्सपर्ट पल्लवी मराठे, ॲड. मयूर दोडके आणि सीसीटीव्ही एक्सपर्ट मोहसीन सिकंदर शेख यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी वादकांना कायद्याच्या चौकटीत राहून सर्व नियमांचे पालन करण्याचे, नियमित सराव करण्याचे तसेच व्यसनमुक्त राहून गणरायाची सेवा करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पोमण यांनी केले.
