July 14, 2026
IMG-20260713-WA0067
Spread the love



11 व 12 जुलै 2026 रोजी बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने वर्ल्ड शोतोकान कराटे फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष माननिय इब्राहिम छलियत सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय कराटे प्रशिक्षण शिबिर ” गीताई सभागृह “,शिवणे गाव पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या शिबिराचे उदघाटन राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून व दीप प्रज्वलित करून करण्यात आले याप्रसंगी शिबिरात माननिय इब्राहिम छलियत यांनी कराटे कलेतील काता या प्रकाराचे सखोल ज्ञान देऊन प्रत्येक पैलूंचे स्पष्टीकरण देत कराटे कलेचे महत्व सांगितले . मुला मुलींनी आपल्या ध्येयाकडे वेगाने जाताना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे ही काळाची गरज असल्याचे सांगून या कलेच्या व्यायामाने प्रत्येकाला निरोगी,सुदृढ व निडर राहता येते. आणि म्हणून शासनाने या कलेला अग्रस्थानी महत्व दिले पाहिजे . असे आवर्जून शिबिराथींना सांगितले .
या शिबिरामध्ये काँग्रेस भवन,शिवाजीनगर , नांदेड सिटी, भू गाव,बावधन , शिवणे गाव, तालुका इंदापूर, स्वाधार संघनेतील बुधवार पेठ व सोमवार पेठ शाखा , भारत इंग्लिश स्कूल ,वारजे माळवाडी,दत्तवाडी, त्याच प्रमाणे इतर माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मिळून 150 विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होते … शिबिरातील प्रत्येक शिबिराथींना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले,सदर शिबिराचे आयोजन बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याने केले होते , याप्रसंगी अध्यक्ष लतेंद्र भिंगारे,उपाध्यक्ष शुभम रणदिवे,सचिव कल्याणी दारवटकर मॅडम, श्रीकांत तिळवे अरविंद थोरात, शांताराम दारवटकर, व इतर प्रशिक्षक उपस्थित होते… आपले लतेंद्र भिंगारे सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी