June 29, 2026

आज दिनांक 26 जून 2026 रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या 152 व्या जयंती निमित्ताने भीमनगर मंडळ, मंगळवार पेठ येथे संविधान दिंडी काढण्यात आली आणि मोफत वाचनालय व अभ्यासिकाचे माननिय सौ.पल्लविताई जावळे, नगरसेविका यांच्या शुभ हस्ते उद घाटन करण्यात आले,

0
IMG-20260626-WA0064
Spread the love


याप्रसंगी इयत्ता दहावीच्या व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले..आजच्या परिस्थितीत मुला मुलींचे काही अंशी शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे मुला मुलींची दिशाहीन अवस्था ऐकायला व पहायला मिळते… म्हणून आयुष्याला आपल्या ध्येयाकडे वेगाने न्हेण्याकरिता प्रत्येक मुला मुलींनी ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे रोज नियमाने आपले ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवून ते गाठण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे… त्यात येणाऱ्या अडचणीवर मात केली पाहिजे,सांगत उच्च विचारांची धरली पाहिजे,रोज नियमाने अभ्यास केला पाहिजे, थोर महा पुरुषांची पुस्तके वाचली पाहिजे,त्यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून आयुष्याचे ध्येय मिळवले पाहिजे…. असे उदगार काढले… या प्रसंगी आचार्य अत्रे रात्र प्रशालेचे प्राचार्य श्री. सातपुते सर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या रात्रीच्या शाळेचे महत्व सांगून जे दिवसभर काम करतात त्यांनी रात्रीच्या शाळेला यावे आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करावे आणि पुढील पिढीला एक आदर्श म्हणून कार्यरत राहावे,असे आवर्जून सांगितले, तसेच माजी शिक्षण प्रशासकीय अधिकारी श्री गोवर्धन सोनवणे यांनी आपण केवळ शिक्षणामुळे मी अधिकारी होऊ शकलो…त्याच प्रमाणे भीमनगर ची आदर्श कन्या विक्रीकर निरीक्षक असलेल्या करुणा चव्हाण यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे आवर्जून सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे आदर्श व प्रेरणा आहे त्यांना डोळ्यासमोर ठेवून मी माझे ध्येय साध्य केले,आणि सर्वांनी राजश्री शाहू महाराज,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श घेऊन जीवनाचे सार्थक करावे …असे उद्देशून सांगितले तसेच
महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने पांडुरंग शेलार व शेखर जावळे यांनी या अभ्यासिकेतील उत्कृष्ट विद्यार्थ्याला दरवर्षी रुपये पाच हजार शिष्यवृत्ती जाहीर केली, तसेच याच ग्रंथालयाला डॉ.सुधाकर भोसले यांनी देखील रुपये पाच हजार देणगी जाहीर केली.
या प्रसंगी भीमनगर मंडळाचे, वंदना संघाचे व तक्षशिला महिला मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते… या कार्यक्राचे अध्यक्ष विजय सरावते होते प्रास्ताविक किशोर भोसले यांनी केले तर या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन लतेंद्र भिंगारे यांनी केले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी