June 29, 2026

लोककलावंतांना राजाश्रयाची गरज; समरसता लोककला संमेलनामध्ये लोककलावंतांची मागणी

0
IMG-20260629-WA0053
Spread the love


पुणे – महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षांपासून लावणी, तमाशा, गवळण ,भारुड ,पोवाडा आदी विविध प्रकारच्या लोककला सादर होत आहेत. या लोककलांनी महाराष्ट्राचे जगणे आणि संस्कृती समृद्ध केले आहेत. या लोककला महाराष्ट्राची ओळख आणि वैभव झाले आहेत परंतु या कला सादर करणारे लोककलावंत मात्र अद्याप अनेक समस्यांना तोंड देत आहेत. लोककलावंत टिकले तरच खऱ्या अर्थाने लोककला टिकेल लोककलावंतांना आधार देण्यासाठी लोकांच्या पाठिंबाबरोबरच सरकारने आधार देऊन त्यांना राजश्रय देण्याची गरज आहे असे मत ज्येष्ठ लोककलावंतांनी केली.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय आणि समरसता साहित्य परिषदेतर्फे पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या समरसता लोककला संमेलनामध्ये जेष्ठ लोककलावंतांनी आपली भावना व्यक्त केली . ज्येष्ठ नृत्यांगना मंगला बनसोडे, सुरेखा पुणेकर, ज्येष्ठ गायक नंदेश उमप , जयमला इनामदार, पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रचे प्रमुख प्रवीण भोळे आदी चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते. प्रसन्न पाटील, धनंजय खुडे, निलेश गद्रे आदी यावेळी उपस्थित होते , अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
रघुवीर खेडकर म्हणाले, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये पन्नास वर्षांपूर्वी आम्ही लोककला जपली आणि ती समृद्ध केले. पूर्वी तमाशाचे शंभर परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता तमाशाचे केवळ दहा ते बारा फड राहिले आहेत लोककला या लोककलावंतांमुळे टिकले आहेत परंतु लोककलावंत जर आर्थिक अडचणीत असेल तर तो किती वर्ष लोककला आत्मसात करू शकतो त्यामुळे लोककला टिकण्यासाठी सरकारने लोककलावंतांना आधार देण्याची गरज आहे.
मंगला बनसोडे म्हणाल्या, जनतेने माझ्या कलेला कायम दाद दिल्या जनतेच्या प्रेमामुळेच मी आज इथपर्यंत येऊ शकले. प्रेक्षकांनी मला जर प्रेम दिले नसते तर मी हा प्रवास करू शकले नसते. त्यामुळे प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहणार आहे.
सुरेखा पुणेकर म्हणाल्या लोककलावंतांच्या समस्या सरकार पुढे मांडण्याची गरज आहे परंतु सरकारच्या या संमेलनामध्येच स्वतः सरकारचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत हा एक प्रकारे लोककलावंतांचा अपमान आहे. लोककलावंतांच्या समस्या सरकारने ऐकून घेतल्या नाहीत तर त्या कशा सुटतील. गेल्या अनेक वर्षांपासून लोककलावंत समस्यांशी संघर्ष करत आहेत. या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी लोक कलावंतांनी एकत्र येण्याची गरज आहे.
नंदेश उमप म्हणाले, लोककलावंतांनी आपली एकजूट दाखवून दिली पाहिजे. आपण जर एकत्र येऊन येऊन सरकार समोर आपल्या मागण्या मांडल्या तर त्या मागण्या निश्चितच मान्य होतील. मी शासन कमिटीचा सदस्य म्हणून लोककलावंतांच्या अनेक मागण्या आतापर्यंत सरकारसमोर मांडले आहेत आणि त्यापैकी अनेक मागण्या मान्य देखील झाल्या आहेत.
प्रवीण भोळे म्हणाले ज्या लोककलावंतांनी शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या मनोरंजन केले परंतु समाजाने त्यांच्या पदरी काय टाकले हा विचार करण्याची गरज आहे. आज डिजिटलच्या युगामध्ये रंगमंचावरील कला नष्ट होत असताना लोक कलावंत एखाद्या अर्थाने हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा जपत आहेत यासाठी आपण त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी ज्या योजना आवश्यक आहेत त्या योजना लागू करून लोककलावंतांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस यावितीयासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे.
जितेंद्र वाईकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी