प्रेसनोट प्रसिद्धीसाठीयाज्ञवल्क्य आश्रमाच्या ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कार प्रदानकसबा पेठ येथील याज्ञवल्क्य आश्रमाचा ९९ वा वर्धापन दिन व शताब्दी वर्षारंभ
पुणे : याज्ञवल्क्य आश्रमाचा ९९ व्या वर्धापन दिन व शताब्दी वर्षारंभ सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. बाळकृष्ण वाडेकर यांना याज्ञवल्क्य पुरस्कार, अस्मिता चिंचाळकर यांना बालगंधर्व पुरस्कार, मीनाताई कुर्लेकर यांना मुक्ताई पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच श्रीकांत पेटकर आणि ज्योती घोडके यांना ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार, तर शुभांगी गुंड आणि अभिजीत कोळेश्वर यांना सक्रिय कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कसबा पेठ येथील याज्ञवल्क्य आश्रमाचा ९९ वा वर्धापन दिन व शताब्दी वर्षारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पद्माकर कुलकर्णी कुंडेकर महाराज उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष जगदीश नगरकर, कार्यवाह प्रमोद चंद्रात्रेय, ज्ञानेश्वर बेल्हे, अरुण खेडकर, उल्हास पाठक, सुचेता पाताळे, सुजाता मवाळ, मनोज तारे, तृप्ती तारे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासद यावेळी उपस्थित होते.
पद्माकर कुलकर्णी कुंडेकर महाराज म्हणाले, एखादी संस्था शंभर वर्षे कार्यरत राहण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामाजिक कार्य महत्त्वाचे असते. अशा संस्थांचे कार्य पुढे सुरू राहण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला पाहिजे. अशा संस्थांमुळेच समाजात मानवता आणि आपुलकी टिकून राहते, असेही त्यांनी सांगितले. शर्वरी पारेकर हिने नृत्यातून गणेश वंदना सादर केली. यशश्री पुणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : कसबा पेठेतील याज्ञवल्क्य आश्रमाचा ९९ व्या वर्धापन दिन व शताब्दी वर्षारंभ सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
