June 24, 2026

आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित “महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा २०२६” हा भव्यदिव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.

0
IMG-20260621-WA0045
Spread the love
  या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री तब्बू शेख, अभिनेत्री स्मिता महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच चित्रपट व नाट्य संस्था (महाराष्ट्र राज्य) व पोलिस सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शुभम शशिकांत मोरे, आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक गणेश विटकर, समाजहित, उद्योग, कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना “महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले. यामध्ये कर्तव्यदक्ष महाराष्ट्र पोलीस अधिकारी मा. अनिस जी शेख, युवा उद्योजक अनिकेत जगताप, जीवरक्षक राजेश काची व दिग्दर्शक सागर सकट यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपल्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी समाजातील सकारात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य व्यासपीठ मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अशा प्रकारचे पुरस्कार सोहळे नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य करतात, असेही यावेळी नमूद करण्यात आले.एकूणच, “महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा २०२६” हा समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करणारा, प्रेरणा देणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी