जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त… “. खेळाडूंचे खच्चीकरण ” थांबणार का……. ?
गाव पातळी पासून ते देश पातळी पर्यंतचा प्रत्येक क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक खेळाडू देशासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्नं पाहत असतो…परंतु आपल्या राज्यातील आणि देशातील क्रीडा क्षेत्रालाही भ्रष्टाचाराने पोखरून अक्षरशः खेळाडूंच्या स्वप्नांना उध्वस्त केले आहे, ….खेळाडूंना आपल्या खेळाच्या सरावासाठी वर्षानुवर्षे निवेदने देऊन ,आंदोलने करून अल्पदरात मैदाने उपलब्ध होत नाही,”एक खेळ एक संघटना” ही योजना राबवली जात नाही ,त्यामुळे एक खेळाच्या तीन,चार संघटना उभ्या राहिल्या आणि अधिकृत व अनधिकृत संघटना म्हणून वाद निर्माण झाले…यात खेळाडूंच्या स्वप्नांची दिशाभूल करण्यात आली,त्यामुळे बोगस प्रमाण पात्रांचा लाखो रुपयांनी बाजार व सुळसुळाट वाढत गेला ज्यामध्ये प्रामाणिक,कष्टाळू खेळाडू बाजूला सारला गेला,त्याची स्वप्ने धुळीला मिळाली,अनेक दिग्गज नामांकित नावाने दिले जाणारे पुरस्कार,तसेच शिव छत्रपती पुरस्कार व अनेक जीवन गौरव पुरस्काचे भाव ठरू लागले, अनधिकृत संघटनांचा बोल बाला ठरू लागला , खेळाडूंच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांना खुनाच्या धमक्या येऊ लागल्या, आपल्या खेळाच्या पवित्र्यासाठी व अस्तित्वासाठी खेळाडूंना राज्य व केंद्र सरकार तसेच काही क्रीडा अधिकाऱ्यांविरोधात न्याय हक्कासाठी उपोषण ,आंदोलन करावे लागते हे मोठे क्रीडा क्षेत्राचे दुर्दैव आज खेळाडूंच्या नशीबी आले आहे…या अशा अनेक कारणांमुळे व्यक्त केले तर वावगे ठरणार नाही…
त्याच प्रमाणे आजच्या चालू असलेल्या अत्यंत नीच व हीन राजकीय परिस्थितीत खेळाडूंना न्याय मिळेल की नाही हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे…..
कळावे, आपले लतेंद्र भिंगारे, अध्यक्ष , क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य….
