June 21, 2026

श्री महालक्ष्मी मंदिरात यज्ञाने अधिक मास कार्यक्रमांची सांगतापाऊस पडावा, यासाठी प्रार्थना ; महिनाभर धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम

0
IMG-20260621-WA0040
Spread the love


पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे अधिक मास निमित्त महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता नुकत्याच झालेल्या यज्ञ आणि पूर्णाहुतीने झाली. सर्वदूर दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना पाऊस पडू देत तसेच जगात शांतता नांदावी, याकरिता प्रार्थना देखील करण्यात आली.

ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांसह प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल व डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी महिनाभर झालेल्या उपक्रमांचे संयोजन केले. यावेळी विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, रमेश पटोदिया, मुरलीधर चौधरी यांसह पदाधिकारी व मंदिराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मागील महिन्यात कमल पुष्प अर्चना आणि विष्णू यागाने कार्यक्रमांना प्रारंभ झाला होता. उपक्रमांमध्ये डॉ.भावार्थ देखणे यांचे प्रवचन, मीनू पोतदार यांचे सुंदरकांड सादरीकरण, राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ.चारुदत्त आफळे यांचे कीर्तन यांसह श्री सूक्त हवन, सुवर्ण कमल रजत कमल अर्चना, सहस्त्र बेल पत्र अर्चना, तुळशी अर्चना, पुष्प अर्चना, दीप उत्सव असे धार्मिक कार्यक्रम झाले.

याशिवाय संतोषी मुंदडा व ग्रुपचे भजन, प्रिया डिसा व ग्रुपचा गरबा, गीता परिवार तर्फे विष्णू सहस्त्रनाम सामूहिक पठण व आरती, ओम नमो भगवते वासुदेवाय नम: चे सामूहिक पठण, श्री सूक्त सामूहिक पठण, होम पूर्णाहुती असे कार्यक्रम देखील पार पडले. तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये पुस्तक तुला, गो माता अन्नकोट, झुला उत्सव, धान्य तुला दान याचे आयोजन करण्यात आले होते.

  • फोटो ओळ : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे अधिक मास निमित्त महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता नुकतेच झालेल्या यज्ञ आणि पूर्णाहुतीने झाली. दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना सर्वत्र पाऊस पडू देत तसेच जगात शांतता नांदावी, याकरिता प्रार्थना देखील करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी