July 20, 2026

हिंदू संस्कृतीचा प्रचार करणे हे सर्वांचेच कर्तव्य – चारुदत्त आफळे

0
IMG-20260601-WA0030
Spread the love

-नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे प्रियकर हिंदुस्तान विषयावर व्याख्यान

पुणे – गजवा ए हिंद करण्यासाठी अनेक लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काम करत आहेत. या देशात हिंदू जिवंतच राहू नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही मानसिकता हाणून पाडण्यासाठी प्रत्येकाने हिंदू संस्कृतीचा आपापल्या परीने प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे नव्हे तर ती काळाची गरज बनली आहे. हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे आपले कर्तव्यच आहे असे मत जेष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.

नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे प्रियकर हिंदुस्थान या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमाला मध्ये चारुदत्त आफळे बोलत होते. यावेळी वक्ता विभाग प्रमुख दीपक मेहंदळे , संचालक अमेय सप्रे ,प्रीतम थोरवे, शेखर यादव आदी यावेळी उपस्थित होते.

चारुदत्त आफळे म्हणाले, हिंदू किंवा हिंदुस्थान हे शब्द उच्चारताना आपल्याला संकोचल्यासारखे वाटावे अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. इतर संस्कृती किंवा देश आपले नाव उच्चारताना अभिमानाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते परंतु आपल्याला मात्र संकोचिलासारखे होते ही केवळ आपल्यासाठीच नव्हे तर हिंदू संस्कृतीसाठी धोकादायक बाब आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे ही भावना आपण मनामनामध्ये रुजवली पाहिजे असे आवाहन चारुदत्त आफळे यांनी यावेळी केले.

स्वातंत्र्य नंतर शिक्षण व्यवस्थेवर चुकीच्या शक्तींचा पगडा असल्यामुळे केवळ इंग्रजीचे लांगुलचालन आणि पाश्चात्य संस्कृतीचे उदात्तीकरण अशा प्रकारे हिंदू संस्कृतीला कमी लेखण्याचा प्रकार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होत आला आहे. परंतु आता जेव्हा गजवा ए हिंद करण्यासाठी शक्ती एकवटल्या असताना हिंदूंनीही आपली वज्रमूठ बळकट करणे गरजेचे आहे तरच खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील अखंड भारत निर्माण करू शकू असा विश्वास चारुदत्त आफळे यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमेय सप्रे यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रीतम थोरवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी